अक्षरं, माणसं, घर, इमारती, निसर्ग, शहर अशा प्रतीकांमधून एक वेगळा संदेश चित्रामार्फत दिला जातो यालाच ‘डूडलिंग’ म्हणतात. ‘गुगल डूडलिंग सर्वाना माहिती आहे. रोज नव्या विषयातून मिळणारा संदेश आपल्यापर्यंत कलात्मकतेने पोहचावा व तो बघताना त्यातला रंजकपणाही लक्षात यावा ते म्हणजे ‘डूडलिंग’. प्रिंट्सच्या बाबतीत डुडलिंगची संकल्पना ही कॅनव्हासवर मोकळेपणे उमटणाऱ्या ब्रशच्या फटकाऱ्यांमधून साकारणाऱ्या रंगांच्या अदाकारीसारखी आहे.

रंगांनी आपलं आयुष्य खूप सुखकर केलं पण त्याचबरोबर विविध छटा, चित्रं, एम्ब्रॉयडरी, डिझायन यामुळे आपलं जग आणखीनच खुलून गेलं आहे. म्हणजेच आपल्याला पडदे, टेबलक्लॉथपासून ते कपडय़ांपर्यंत रंगांपेक्षाही त्यावरची असलेली कलाकुसर जास्त आकर्षित करत आली आहे. त्यात दरवेळेस नवनवीन बदल व नवी कलात्मकता दिसून येते. हाताने काढलेल्या चित्रांपासून ते आता एकविसाव्या शतकात कॉम्प्युटराईज्ड ड्रॉइंग्जपर्यंत जग विस्तारलंय. कपडय़ांवर पूर्वी हाताने केले जाणारे काम आता प्रिंटच्या रूपात नव्याने घर करून बसलेय. जॅकेट्स, टी-शर्ट्स, टॉप्स, जीन्स तसेच हल्ली ट्रॅडिशनल वेअरमध्ये म्हणजेच लेहेंगा, पायजमा, पलाजो वगैरेवरही प्रिंटच असणारे कपडे आपण दैनंदिन जीवनात वापरतो. आपल्याला आकर्षित करतात ते त्यांचे वेगवेगळे पॅटर्न्‍स. त्यामुळे प्रिंटच्या रूपातल्या कपडय़ांना आता अनन्यसाधारण महत्त्व येतेय हे खरंय. डूडल हा सध्या कपडय़ांवरच्या प्रिंटिंगमधला नवा अध्याय ठरला आहे.

अक्षरं, माणसं, घर, इमारती, निसर्ग, शहर अशा प्रतीकांमधून एक वेगळा संदेश चित्रामार्फत दिला जातो. यालाच ‘डूडलिंग’ म्हणतात. ‘गुगल डूडलिंग’ सर्वाना माहिती आहे. रोज नव्या विषयातून मिळणारा संदेश आपल्यापर्यंत कलात्मकतेने पोहचावा व तो बघताना त्यातला रंजकपणाही लक्षात यावा ते म्हणजे ‘डूडलिंग’. प्रिंट्सच्या बाबतीत डूडलिंगची संकल्पना ही कॅनव्हासवर मोकळेपणे उमटणाऱ्या ब्रशच्या फटकाऱ्यांमधून साकारणाऱ्या रंगांच्या अदाकारीसारखी आहे. रेषा-चित्र अशा कोणत्याही पॅटर्नमध्ये आविष्कारित होणारे डूडलिंग प्रिंटचे कपडे आपल्याकडे साधारणत: १९९० च्या दशकात नावारूपाला आले होते. ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात करिश्माचे जॅकेट्स, सलमानचे शर्ट, आमिरचा टाय साधारण डूडलिंग पद्धतीच्या प्रिंटमध्ये दिसले. सध्या आलिया भट्ट  डूडलिंग फॅशनचे कपडे बऱ्याचदा वापरताना दिसते. ‘शानदार’ फिल्मचं प्रमोशन असेल किंवा इतर ठिकाणी ती डूडलिंगमधले हॉल्टर गाऊन तसेच टी-शर्टमध्ये दिसली आहे. बॉलीवूडमध्येही डूडलिंग फॅशन म्हणजे प्रत्येक सिनेमाचा एक नवा इमर्जिग लुकच ठरतोय.

‘यंदा लॅक्मे फॅशन वीक’मध्ये कपडय़ांवरच्या डिझाइनमध्ये डूडलिंग तसेच विविध आंतरराष्ट्रीय चित्ररचनेला महत्त्व दिले होते. या वेळेस ‘द मराकी प्रोजेक्ट’, ‘डूडल एज’, नकीता सिंग, ऊर्वशी जोनेजा, साहिल एनेजा, गौरांग, नचिकेत बर्वे यांनी विविध प्रिंट्सची फॅशन परत आणली. या वेळेस डूडल व पारंपरिक  (उर्वरित पान २ वर)  चित्रांप्रमाणेच टायपोग्राफी, मंगा आर्ट, मंगला आर्ट यांचे ठसेसुद्धा कपडय़ांवर उमटलेले दिसले. या सीझनला सर्व डिझायनर्सचा हेतू रंगांपेक्षा प्रिंटच्या डिझाइनला जास्त महत्त्व देणारा होता. तसं डिझायनर गौरांग त्यानिमित्ताने स्पष्टपणे म्हणला, ‘या सीझनला मी मुद्दामच प्रिंटच्या रंगांऐवजी डिझाइनचा विचार केला. कारण निव्वळ रंगामुळे एम्ब्रॉयडरीला एक विशिष्ट तात्पुरता लुक मिळेल पण खास भारतीय पारंपरिक हस्तकलेचा वापर केल्यामुळे संपूर्ण लुकमध्ये कमालीचं व्हेरिएशन मिळतं’.

‘द मराकी प्रोजेक्ट’ या लेबलखाली डूडलिंगचं वेगळं चित्र कपडय़ांच्या रूपात पाहायला मिळालं. या लेबलची डिझाइनर सोनालीच्या म्हणण्यानुसार, ‘खरं तर लहानपणीची चित्रकलेची आवड जशी सगळ्यांना कायम स्मरणात असते तशी माझी या वेळेची संकल्पना होती. लहान मुलांच्या चित्रकलेच्या पुस्तकात त्यांना रंगवायला जसे हत्ती, डोंगर, झाडं, घोडे असतात तसे ते माझ्या कलेक्शनमध्येही आहेत’. नकिता सिंग या डिझाइनरने डूडलिंग हे खादी फॅब्रिकवर तयार करून तसे गार्मेट बनवले. ती सांगते की, ‘या प्रत्येक आऊटफिटवर खूप डूडलिंगचा प्रिंटच्या रूपातला प्रभाव पारंपरिक खादी, बंगाली हॅण्डलूम म्हणजेच बेगमपूर कॉटन, चंदेरी अशा कपडय़ांवर भर दिल्यामुळे ही कलेक्शन्स मी खास सीझनल वेअर म्हणून आणली.’ ऊर्वशी जोनेजा व साहिल अनेजा या दोन डिझायनर्सनी नवे प्रिंट्स व पॅटर्नस त्यांच्या कलेक्शनमध्ये आणले. अ‍ॅबस्ट्रॅक्ट फॅशन म्हणजे विविध रेषा, आकारांपासून त्यात विविध बॉल्ट रंगांचा मेळ यांचा प्रिंटेड आऊ टफिटवर वापर केला गेला आहे. त्याचबरोबर ‘डूडलएज’ या लेबलखाली डिझायनर कीर्ती तुला सांगते की भौमितिक आकारांच्या डूडलनुसार अप-सायकल केलेल्या फॅब्रिकवर म्हणजेच ऑरगॅनिक कॉटन, खादीवर कोलाज तयार करून त्यात विविध डूडलच्या आधारे केलेल्या फॅब्रिकचा आऊटफिटमध्ये समावेश आहे. नचिकेत बर्वे या डिझायनरने टायपोग्राफी या कलेला ब्राइडल वेअरमध्ये आणलं आहे. टायपोग्राफीमुळे तयार झालेलं डिझायन हे संपूर्ण लेहेंग्यावर म्हणा वा गाऊनवर खुलून दिसतं. त्याच्या म्हणण्यानुसार ग्रीक भाषेत ही टायपोग्राफी आहे. तसेच यापुढे टायपोग्राफीला कपडय़ांवर एमब्रॉयडरीसारखं महत्त्व नक्की येईल.

एकूणच डूडलिंगमध्ये वापरली जाणारी एम्ब्रॉयडरी म्हणा वा डिझाइन, एकूणच कलेक्शनमध्ये या वेळेस प्रत्येक आऊ टफिटवरचा पॅटर्न वेगळा होता. त्यामुळे या कपडय़ांमध्ये एकाचवेळी वैविध्यही पाहायला मिळाले आणि त्यांची मांडणीही ब्रायडल, फॉर्मल, कॅज्युअल, सिंपल, डेनिम वेअर अशा प्रत्येक प्रकारातून केली असल्याने कोणताही लुक तुम्ही डूडलिंगमध्ये सहज मिळवून शकता हेही लक्षात आलं. त्यामुळे या फॅशन वीकवर गारूड करणारा हा प्रिंटस् व डूडल फॅशनचा ट्रेण्ड लवकरच बाजारातही वरचढ ठरेल यात शंका नाही.

डिझायनर्सकडून खास डूडलिंग वेअरसाठी टिप्स –

१. सध्या ब्रायडल सीझन असल्याने नचिकेत बर्वेच्या कलेक्शननुसार टायपोग्राफीतला घागरा किंवा लेहेंग्यावरचे ब्लाऊ ज हे कधीही जीन्स किंवा पलाझोवर परिधान करू शकता. त्यामुळे घाईगडबडीच्या वेळेस मनासारखा लुक म्हणजे पारंपरिक पण मॉडर्न लुक मिळतो.

२. डिझायनर सोनालीच्या कलेक्शनप्रमाणे डूडल प्रिंट जॅकेट हे ब्लॅक मिडीवर, लुज पॅन्टस् डूडल प्रिंट ब्लाऊ जवर तसेच जंपसूट डूडल प्रिंट वेस्टकॉटवर वापरू शकता.

३. नकिताच्या म्हणण्यानुसार डूडल प्रिंट साडीवर अ‍ॅन्टी-फीट शर्ट घालू शकता. त्याचप्रमाणे ऊर्वशी जोनेजाच्या कलेक्शननुसार सिंपल लुक मिळवण्यासाठी तिच्या सिल्क प्रिंटेट लॉन्ग रॉबचा विचार पार्टीसाठी केला जाऊ शकतो.

४. गौरांगचं कलेक्शन हे पूर्ण ब्रायडल असल्याने पारंपरिक साडय़ा, लेहेंगा, अनारकली, चुडीदार हे अस्सल मेहेंदी, संगीत व लग्नासाठी उत्तम ठरतील.

५. ‘डूडलएज’च्या कलेक्शनप्रमाणे जीन्स व जंपरचा विचारही सरळसरळ कॉलेजमध्ये व फॉर्मल म्हणून ऑफिस लुक  मिळवण्यासाठी करू शकता.