स्तनपान करणाऱ्या मातांनो गर्भधारणेपूर्वी लसणीचे डोहाळे लागले असतील तर जरा काळजी घ्या, कारण स्तनपान करताना या दुधाला लसणीचा वास येऊ शकतो. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार गर्भवती असतानाच्या काळात जर वास येणारे पदार्थ खाल्ले तर त्या पदार्थाचा वास गर्भधारणेनंतर मातेच्या दुधाला येतो.

हे संशोधन जर्मनीमधील विद्यापीठांमध्ये करण्यात आले असून वैज्ञानिक अँड्रिआ बटनर यांच्या मते गर्भवती असताना घेण्यात येणाऱ्या आहाराचा नवजात बालकांवर काय परिणाम होतो याबद्दल संशोधन होत असले तरी आपल्याकडे याची फारच कमी माहिती आहे. मात्र, असेही समोर आले आहे की मातेचे दूध ज्या चवीचे असते त्या चवीचे पदार्थ बालकांना आवडतात. ज्याची चव आणि वास जास्त दाट असतो अशा पदार्थापैकी एक लसूण. गर्भधारणेच्या अडीच तास आधी लसूण खाल्ल्यास त्याचा वास स्तनपान करताना दुधाला येतोच. लसूण या पदार्थानंतर जर काही येत असेल तर सर्दी-खोकल्याची औषधे. यांचा वासही त्यातील घटकांमुळे अत्यंत दाट असतो. या वासाचा परिणामही स्तनपानाच्या दुधावर होऊ शकतो.

आतापर्यंत तरी संशोधकांचे संशोधन स्तनपानातील दुधाच्या चवीवर आणि वासावर मर्यादित आहे, पण नवजात अर्भकावर परिणाम करणाऱ्या घटकांवर  अजूनही संशोधन सुरू आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)