सांगली : पाकिस्तानातील कसाबच्या नावाने रेल्वे स्टेशन आरडीएक्स बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अटक करण्यात आली.

सांगली शहर पोलीस ठाण्यात दि. १४ मे रोजी रात्री मिरज व सांगली रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी रियाज कसाब या नावाने लाहोरमधून बोलतोय म्हणून फोनवरून देण्यात आली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी रात्रभर दोन्ही स्टेशनवर झाडाझडती घेतली. मात्र, झडतीनंतर हा फोन धमकी असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Somy Ali on salman khan aishwarya rai relation
“ती सलमानबरोबर असताना…”, भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचं ऐश्वर्या रायबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाली, “लॉरेन्स बिश्नोई हा…”
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
man murdered colleague over dispute on food cooking
धक्कादायक! हॉर्न का वाजवता? विचारल्याने दोन बहि‍णींकडून माजी पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
Two terrorist organizations Jaish e Mohammed and SJF plan to bomb airports railway stations and temples
विमानात बॉम्बची धमकी देणारा …, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल काय म्हणाले जाणून घ्या

हेही वाचा – सोलापूर : हातउसने दिलेली रक्कम परत न केल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून

हेही वाचा – सोलापूर : नातेपुतेजवळ क्षुल्लक कारणांवरून मेव्हणा आणि भावजीचा खून

कसाबच्या नावाने फोनवरून बॉम्बस्फोटाची धमकी देणार्‍या व्यक्तीचा तांत्रिक तपास करण्यात आला. धमकी प्रकरणी सचिन मारूती शिंदे उर्फ माधव किसन भिसे (वय ३५ रा.शिंदे मळा तरटगाव, ता. फलटण, जि. सातारा मूळ गाव- गोपवाडी, लोहारा, ता. पुसद जि. यवतमाळ) याला अटक करण्यात आली. तो कौटुंबिक वादातून वैफल्यग्रस्त असून यापूर्वी त्यांने मुंबई, पुणे, नागपूर पोलिसांनाही रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तो भुरट्या चोर्‍याही करत असल्याने त्याच्यावर चोरीचे गुन्हेही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.