सोलापूर : हातउसने घेतलेली ५० हजार रुपये परत न दिल्याचा रोष मनात धरून एका मागासवर्गीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करून नंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी ते बीबी दारफळ रस्त्यावर घडला. या घटनेची फिर्याद आठवड्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हेही वाचा – सांगलीचे खासदार कोण ? पैज समर्थकांच्या अंगलट

Solapur crime news, Solapur 20 gram gold stolen marathi news
सोलापूर: गोवा पर्यटन करून परतणाऱ्या दाम्पत्याची सांगोल्याजवळ वाटमारी
natepute, murder, Solapur,
सोलापूर : नातेपुतेजवळ क्षुल्लक कारणांवरून मेव्हणा आणि भावजीचा खून
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Solapur, black magic,
सोलापूर : मोहोळजवळील स्मशानभूमीत जादूटोण्याचा अघोरी प्रकार उजेडात, महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Sangli, bomb, threat
सांगली : कसाबच्या नावाने बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Sanjay Shirsat On Sanjay Raut
संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानाला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “मुख्यमंत्रीपदासाठी…”

हेही वाचा- सोलापूर : नातेपुतेजवळ क्षुल्लक कारणांवरून मेव्हणा आणि भावजीचा खून

महेश ऊर्फ बबलू भारत लोंढे (वय ३०, रा. गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ आनंद भारत लोंढे याने दिलेल्या फिर्यादीनुसार अजय सौदागर कदम (वय २३, रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. त्याने मृत महेश लोंढे यास काही महिन्यांपूर्वी हातउसने म्हणून ५० हजार रुपये दिले होते. ही रक्कम मुदत संपल्यानंतरही परत करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे अजय कदम हा महेश लोंढे याच्यावर चिडून होता. तो भेटतही नव्हता. दरम्यान, अकोले काटी ते बीबी दारफळ रस्त्यावर संभाजी दशरथ भोसले यांच्या शेताजवळ महेश लोंढे यास अजय कदम याने गाठले आणि रागाच्या भरात त्याने दगडाने ठेचून त्याचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्यावर खुनासह गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे आणि जातीवाचक शिवीगाळ करणे (ॲट्रासिटी कायदा) आदी कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.