डॉ. विश्वनाथ बिल्ला, मूत्रविकारतज्ज्ञ

मूत्रविसर्जन ही आपल्या शरीरातील अशुद्ध घटक शरीराबाहेर उत्सर्जति करण्याची एक नसíगक व अत्यावश्यक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मूत्रिपडातून दर तासाला ७० ते ८० मिलिलिटर इतके मूत्र तयार होत असते. मात्र काही वेळा अधिक पाणी प्यायल्यामुळे, संसर्ग किंवा आजाराची लागण झाल्यामुळे शरीरातून अधिक प्रमाणात मूत्र बाहेर टाकले जाते. उन्हाळ्यात वातावरणात उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने सतत तहान लागते व नेहमीपेक्षा अधिक पाणी प्यायले जाते. मात्र उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडते. अशा वातावरणातही वातानुकूलित कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र वारंवार लघवीला जावे लागते.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट

दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी निरोगी आरोग्यासाठी पुरेसे असले तरी अनेक गरसमजुतीमुळे भरपूर पाणी प्यायले जाते. अनेकदा आपल्याला वारंवार मूत्रविसर्जनचा त्रास आहे, हे लक्षात येत नाही. यासाठी लक्षणांकडे व शारीरिक बदलांकडे लक्ष ठेवून वेळीच तपासणी करून घ्यावी. मूत्रिपड दररोज साधारण १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून रोज दोन लिटर मूत्र तयार होते.

अतिरिक्त मूत्र बाहेर पडण्याची कारणे

  • जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने, सरबत किंवा इतर द्रव्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे मूत्र बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते.
  • चहा, कॉफी, थंड पेय, मद्य, धूम्रपान आदी पदार्थाचे सेवन.
  • मूत्राशयाला सूज येणे, मूत्रिपडे निकामी होणे किंवा मूत्रात जंतुसंसर्ग होणे.
  • मधुमेही व्यक्तींच्या रक्तातील साखर वाढलेली असते. साखरेच्या अतिप्रमाणामुळे रुग्णांना वारंवार लघवी होते.
  • गर्भावस्थेत साधारण चौथ्या ते पाचव्या महिन्यानंतर गर्भाशयाचे आकारमान वाढते. या गर्भाशयाचा दबाव मूत्राशयावर येऊन वारंवार कमी प्रमाणात लघवी होत राहते.
  • रक्तदाब, झोपेची समस्या किंवा तत्सम आजारांसाठी घेतलेल्या औषधांचा परिणाम मूत्राशयावर होतो.
  • तरुणींमध्ये लैंगिक संबंध सुरू झाल्यावर संसर्ग होण्याची शक्यता वाढते, याला हनिमून सिस्टिटिस असे म्हटले जाते.
  • योनीतील जंतुसंसर्गाचा परिणाम.
  • मानसिक तणाव, चिंता, भीती या कारणांमुळेही वारंवार मूत्रविसर्जनाची भावना होते.
  • मूत्राशयावर जास्त भार आल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता असते.
  • शरीराच्या अतिरिक्त वजनामुळेही मूत्राशयावर भार येतो.
  • मूतखडा, बद्धकोष्ठता किंवा मलावरोध या कारणांमुळे मूत्राशयावर भार येतो.
  • उतारवयात वारंवार मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढत जाते. मूत्राशयाच्या निमुळत्या भागावर असलेल्या ग्रंथी वयानुसार वाढत जातात आणि यातून मूत्रविसर्जनावर नियंत्रण न राहणे किंवा वारंवार मूत्रविसर्जनसारख्या समस्या निर्माण होतात.

उपचार

  • वारंवार लघवी होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • मूत्राची आणि रक्ताची तपासणी करावी.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम सुरू करावा.
  • मूत्राशयाच्या संसर्गामुळे ही समस्या भेडसावत असल्यास मूत्रमार्गाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.
  • मधुमेहाची चाचणी करून घ्यावी.
  • मूत्रविसर्जनाची भावना आल्यास कुठल्याही कारणाने ते तुंबवून ठेवू नये.
  • रात्रीच्या वेळी वारंवार मूत्रविसर्जनाच्या तक्रारी येत असल्याने झोपेत अडथळा निर्माण होतो. यासाठी झोपण्यापूर्वी चहा, कॉफी, दारू, फळांचा रस किंवा तत्सम पदार्थ पिणे टाळावे.

मूत्राशयाच्या आजाराची लक्षणे

मूत्राशयाच्या आजारात वारंवार मूत्रविसर्जनाचा त्रास संभवतो. याशिवाय मूत्रमार्गावर जळजळ होणे, मूत्राला अधिक दरुगध येणे, ओटीपोटात दुखणे ही मूत्राशयाच्या आजाराची लक्षणे आहे. प्रमाणापेक्षा जास्त मूत्रविसर्जनामुळे अशक्तपणा, ताप, पाठीचे दुखणे, मानसिक तणाव व वजन घटणे आदी समस्या निर्माण होतात.

महिलांमध्ये मूत्रविसर्जनाच्या तक्रारी

महिलांच्या मूत्रविसर्जनाची जागा मलविसर्जनाच्या जागेजवळ असल्याकारणाने संसर्ग होण्याची शक्यता वाढते. यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा प्रश्न अधिक भेडसावतो. महिलांचा मूत्रमार्ग लहान असल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता वाढते. मात्र ही जागा स्वच्छ करताना मागून पुढे न जाता पुढून मागे जात स्वच्छ करावे यातून संसर्ग टाळता येऊ शकतो. प्रवासात असताना वेळेत स्वच्छतागृह उपलब्ध न झाल्याने अनेकदा महिला लघवी तुंबवून ठेवतात. या कारणाने महिलांमध्ये मूत्राशय संसर्गाच्या तक्रारी निर्माण होतात.