देओमाली पर्वतरांगेमधे समुद्रसपाटीपासून ८७० मीटर उंचीवर वसलेले कोरापुट ही खरंतर ओदिशाला लाभलेली निसर्गाची मोठी देणगी आहे. निसर्गप्रेमींसाठी एक संपन्न परिसर. ओदिशाच्या पश्चिमेला असलेला हा आदिवासी जिल्हा. आदिवासींच्या परंपरा, त्यांची घरे, त्यांचे बाजार, त्यांचे पोशाख हे अगदी जवळून इथे पाहता येते. त्याचसोबत हिरव्यागार पर्वतरांगा, त्यात असलेली दुर्मीळ वनसंपदा आणि इथे असलेले ओदिशामधले दुसरे जगन्नाथ मंदिर अगदी आवर्जून पाहण्याजोगे आहे. सबर श्रीक्षेत्र या नावाने प्रसिद्ध असलेले हे जगन्नाथाचे मंदिर हे एक वैशिष्टय़पूर्ण ठिकाण आहे. तिथेच जवळ असलेले ट्रायबल म्युझियम, मछकुंद नदीवरील डुडुमा धबधबा, नंदपूर, जेपोर ही ठिकाणं कोरापुटपासून जवळच आहेत. कोरापुटला मुक्काम करून ही ठिकाणे पाहता येतात.

सबर श्रीक्षेत्र

banana in 15 thousand hectares of garden dried up in Jalgaon and solapur due to summer heat
उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?

पुरीचा जगन्नाथ हा खरंतर इथे असलेल्या मूळ सबर आदिवासींचा देव असल्याचे मानले जाते. पुरीला असलेल्या पूजा उपासनापद्धती या सगळ्या सबर परंपराच असल्याचे मानले जाते. पुरीला जगन्नाथाच्या रथयात्रेच्या वेळी या सबर लोकांना मान असतो तो कदाचित यामुळेच असेल. फार पूर्वी इथे आदिवासींची अशी एक खास संस्कृती होती. त्यांची जातपंचायत होती आणि तिची सर्वावर हुकूमत चालत असे. इंडो-आर्यन भाषा बोलणाऱ्या लोकांशी यांचा प्राचीन काळी संबंध आला असावा. ओदिशातील काही धार्मिक पंथांचा उगमही इथल्या सबर आदिवासींच्या मूळ धर्मात सापडतो. याच सबर लोकांनी कोरापूट इथे जगन्नाथाचे सुंदर मंदिर बांधलेले आहे. सबर श्रीक्षेत्र असे त्याचे नाव. श्रीक्षेत्र हे नाव फक्त पुरीच्या जगन्नाथासाठी वापरले जाते. पण हे सबरांचे श्रीक्षेत्र आहे. ते जगन्नाथाचेच मंदिर आहे. इथेसुद्धा पुरीसारख्याचा जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेच्या मूर्ती लाकडी ठोकळ्याच्या स्वरूपात आहेत. कुठल्याही जाती-धर्म-पंथाचे लोक या मंदिरात येऊ शकतात.

जेपोर

घनदाट झाडी, सागाच्या वृक्षांची गर्द दाटी, असंख्य धबधबे आणि आदिवासी संस्कृतीने जेपोर संपन्न आहे. कोरापूटपासून फक्त २२ किलोमीटरवर असलेले हे एक नितांतसुंदर ठिकाण. प्रसिद्ध दंडकारण्याशी जोडलेले आणि तिन्ही बाजूंनी आरकू डोंगररांगांनी वेढलेले पूर्व घाटातील अत्यंत देखणे असे हे ठिकाण म्हणजे जेपोर. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापासून जेपोरचे संदर्भ मिळतात. आटविक या किलग नरेशाच्या मांडलिक राजांची इथे सत्ता होती. यांनी प्रसिद्ध किलग युद्धात मोठी कामगिरी केल्याचे सांगतात.

जेपोरला असलेल्या किल्ल्याच्या भोवती मोठी संरक्षक िभत बांधली आहे. जेपोरमध्ये पाण्याचा मोठा तलाव आहे. जगन्नाथ सागर हे त्याचे नाव. जलक्रीडेसाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. कोरापुट जिल्ह्यच्या व्यापाराचे केंद्र म्हणून जेपोर हे गाव विकसित केले आहे. कागदी मास्क तयार करण्याचा मोठा उद्योग जेपोरला विकसित झालेला आहे.

गुप्तेश्वर महादेव

जेपोरपासून ५० किलोमीटरवर एक चुनखडीच्या डोंगरावर वसलेले हे शिवमंदिर अत्यंत रमणीय आहे. कोलाब नदीच्या काठावर असलेल्या डोंगराच्या माथ्यावर असलेल्या एका गुहेत हे शिविलग आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे १८० पायऱ्या चढून यावे लागते. याचसोबत जैन मॉनेस्ट्री, गुलीम इथल्या हिरव्यागार टेकडय़ा, कोतपडपासून जवळ असलेले चित्रकूट धबधबे, मालीगुडा, कोलाब धाम, गुप्तगंगा अर्थात साबेरी नदी, हाथी खडक ही ठिकाणेसुद्धा प्रेक्षणीय आहेत. इथे येण्यासाठी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण इथून रेल्वेने येणे सर्वात उत्तम पर्याय आहे. विशाखापट्टण ते जगदलपूर हा अत्यंत रमणीय असा रेल्वेमार्ग आहे. पूर्वघाटातून येणारा हा रेल्वेमार्ग, त्यावर असलेले अनेक पूल आणि जवळजवळ ५३ बोगदे यामुळे हा प्रवास अगदी संस्मरणीय ठरतो. आरकू डोंगररांगांमधून होणारा हा रेल्वेचा प्रवास चिरस्मरणीय ठरतो यात शंकाच नाही.

दुदुमा धबधबा

मछकुंद किंवा मत्स्य\तीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेला हा मछकुंद नदीवरील दुदुमा धबधबा १७५ मीटर इतक्या उंचावरून कोसळतो. तिथेच मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे. दुदुमा धबधब्यापासून जवळच असलेले अनकडेली हे गाव इथे भरणाऱ्या आदिवासी बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दर गुरुवारी इथे भरणाऱ्या बाजारात आजूबाजूचे आदिवासी लोक येतात. बोंडस जातीचे लोक इथे मोठय़ा संख्येने आहेत.

विशाखापट्टण ते कोरापूट पॅसेंजर

विशाखापट्टणवरून सकाळी ७. ०५ वा.

कोरापूटला दुपारी १.४५ ला पोहोचते.

कोरापूट ते भुवनेश्वरहिराखंड एक्स्प्रेस

कोरापूटवरून संध्या. ५.२५ वाजता निघते

भुवनेश्वरला सकाळी ८.२५ ला पोहोचते.

ashutosh.treks@gmail.com