01vbलाल मिरच्यांचा रंजका

साहित्य :
मूठभर लाल मिरच्या (हिरव्या मिरच्या पिकून लाल झालेल्या मिरच्या)
१ लसणीचा गड्डा
४ लिंबांचा रस
lp26१ चमचा बडीशेप
१/२ चमचा धणेपूड
चवीपुरते मीठ

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

कृती :
१) बडीशेप हलकी भाजून घ्यावी. नंतर खलबत्त्यात त्याची पूड करावी. लसूण सोलून घ्यावी.
२) लाल मिरच्या, लसूण, बडीशेप पावडर, धणेपूड आणि मीठ मिक्सरमध्ये घालून वाटावे. त्यात लिंबाचा रस घालून बारीक वाटून घ्यावे.
हा रंजका पराठा, भाकरी, तसेच आमटी भाताबरोबरसुद्धा छान लागतो.
टीप :
१) रंजका टिकण्यासाठी त्यात लिंबाचा रसच घालावा. पाणी अजिबात
घालू नये. फ्रिजमध्ये बरेच दिवस टिकतो.
रंजका जर बेताचा तिखट हवा असेल, तर मिरच्यांमधील बिया थोडय़ा कमी कराव्यात.

lp28रायआवळ्याची चटणी

साहित्य :
१/२ वाटी रायआवळे
सव्वावाटी कप ओले खोबरे
३ हिरव्या मिरच्या (मध्यम तिखट)
१/२ चमचा जिरे
१/२ ते १ चमचा साखर
चवीपुरते मीठ

कृती :
१) रायआवळ्यातील बिया काढून बाजूचा गर घ्यावा. त्यानंतर सर्व साहित्य (पाणी न घालता) एकत्र मिक्सरमध्ये वाटावे.

टीप :
खोबरे ताजे खवलेले असेल तर चांगले. फ्रिजमधील वापरायचे झाल्यास चटणी करायच्या तासभर आधी लागेल तेवढे खोबरे काढून ठेवावे. रूम टेंपरेचरला आल्यावर मग मिक्सरमध्ये फिरवावे. थंड खोबरे मिक्सरमध्ये फिरवल्यास त्याचे स्निग्धांश वेगळा होतो आणि चटणी चोथापाणी दिसते.

lp27मिक्स भाज्यांचे थालीपीठ

साहित्य :
१/२ वाटी कोबी, उभी पातळ चिरून
१/२ वाटी कांदा, स्लाइस करून
१/२ वाटी किसलेला फ्लॉवर
१/२ वाटी किसलेले गाजर
१/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरलेली
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२ वाटय़ा ज्वारीचे पीठ
३/४ वाटी कणीक
१/४ वाटी बेसन
१/२ चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१/२ चमचा जिरे
चवीपुरते मीठ
तेल

कृती :
१) अडीच वाटय़ा पाणी गरम करावे. त्यात हिंग, हळद, जिरे आणि मीठ घालावे.
२) पाणी उकळले की आच मंद करावी आणि त्यात पिठे घालावी. नीट मिक्स करावे. झाकण ठेवून १ वाफ येऊ द्यावी.
३) भाज्यांना थोडेसे मीठ लावून ठेवावे. म्हणजे भाज्यांना थोडे पाणी सुटेल.
४) पीठ एका परातीत घ्यावे त्यात भाज्या घालाव्यात. कोथिंबीर आणि मिरची घालून मिक्स करावे. मळून घ्यावे. थोडे तेल लावावे.
५) मध्यम आकाराचे गोळे करावेत. तव्याला थोडे तेल लावून थालीपीठ थापावे. कडेने तेल सोडून छान खरपूस भाजून घ्याव्यात.
गरमागरम थालीपीठ लोणी किंवा दह्य़ाबरोबर वाढावे.

lp29पाती कांद्याची चटणी

साहित्य :
१ वाटी पाती कांद्याची हिरवी पात,
बारीक चिरून
१/२ वाटी सायीचे दही
२ हिरव्या मिरच्या

फोडणीसाठी :
१ चमचा तूप,
१/२ चमचा उडीद डाळ,
२ लाल सुक्या मिरच्या,
२ चिमटी हिंग,
५-६ कढीपत्ता पाने
चवीपुरते मीठ
कृती :
१) चिरलेली पात, दही, मीठ आणि हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटावे. चटणी एका वाडग्यात काढावी.
२) कढले गरम करून त्यात तूप घालावे. तूप गरम झाले की त्यात उडीद डाळ घालून लालसर होईस्तोवर परतावे. नंतर लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता घालावा. ही फोडणी चटणीवर घालावी.
मिक्स करून सव्‍‌र्ह करावी. ही चटणी कोणत्याही भजीबरोबर किंवा डोसा, उत्तप्पा, कोथिंबीर वडी यांसारख्या कोणत्याही तिखटमिठाच्या पदार्थाबरोबर छान लागते.

टिपा :
१) जर सायीचे दही नसेल तर साधे दही आणि दुधावरील साय हे मिक्स करून वापरावे. फक्त साधे दही थोडा वेळ सुती कपडय़ात बांधून टांगून ठेवावे. यामुळे चटणी पातळ होणार नाही.
२) जर दही आंबट नसेल तर थोडा लिंबाचा रस घालावा.
वैदेही भावे