साहित्य : १ वाटी नाचणी, १ कांदा, २ हिरव्या मिरच्या, २ लसूण पाकळ्या, आलं, lp59अर्धा चमचा गोड मसाला, लिंबूरस, कोथिंबीर, मीठ, साखर, कढीपत्ता, खोबऱ्याचा कीस, तेल, हळद, मोहरी, हिंग, जिरे, तिखट.
कृती : नाचणी रात्रभर भिजवा. सकाळी उपसून स्वच्छ धुवा. मोड आणण्यासाठी फडक्यात बांधा. कांदा बारीक चिरा. मिरच्या, जिरे, आलं बारीक वाटून पेस्ट बनवा. कोथिंबीर बारीक चिरा. कढईत तेल, मोहरी, हिंगाची फोडणी करा. कांदा नीट परता. तिखट, हळद, मसाला व मोड आलेली नाचणी घालून परता. लिंबूरस, साखर, कोथिंबीर घालून झाकण ठेवा. चांगली वाफ आल्यावर भांडय़ात काढा. सव्‍‌र्ह करताना वरून कोथिंबीर, खोबऱ्याचा कीस घाला.

शेव बर्फी
lp60साहित्य : बर्फीचा खवा पाव किलो, फिकी शेव (विनामिठाची) दीड पाव, साखर २ कप, वेलचीपूड १ टी स्पून, काकडीच्या बिया २ टी स्पून, बदाम-पिस्ते काप पाव कप, केशर व पिवळा रंग (खाण्याचा) प्रत्येकी १ टी स्पून.
कृती : मंद आचेवर खवा थोडा कोरडा होऊन बाजूने तूप सुटेपर्यंत भाजा. साखरेत ३ कप पाणी घालून उकळा. बनवलेल्या पाकात केशर, वेलची, खवा मिसळून चांगले घोटा. हलक्या हाताने शेव मिसळून मिश्रण ट्रेमध्ये पसरा. बर्फीवर काकडीचा मगज व बदाम-पिस्त्यांचे काप पसरवा. बर्फी सेट झाली की मनपसंत आकारात वडय़ा पाडा. सव्‍‌र्ह करा.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
tiger unexpectedly came out of bushes jumped on cow
जंगल सफारीचा आनंद घेत होते पर्यटक, अचानक झुडपातून बाहेर आला वाघ, उडी मारून….पुढे काय घडले ते व्हिडीओमध्ये बघा

टोमॅटो भरीत
lp58साहित्य : ३ टोमॅटो, २ मध्यम आकाराचे कांदे, अर्धा इंच आलं, ५-६ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १ टेबल स्पून कस्तुरी मेथी, १ टी स्पून जिरे, १ टी स्पून साखर, अर्धा टी स्पून दालचिनी (पावडर) व पाव टी स्पून गरम मसाला, २ टी स्पून साय, २ टी स्पून तेल, छोटी वाटी अर्धी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ.
कृती : टोमॅटो पाण्यात उकळून साल काढा. फेटून बलक करा. नॉनस्टिक कढईत तेलावर बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण-मिरची पेस्ट परता. मग फेटलेला टोमॅटो बलक घाला. मीठ, साखर, दालचिनी पावडर, मिरपूड, गरम मसाला घाला. थोडं परता. फेटलेली साय घाला. कस्तुरी मेथी हाताने कुस्करून घाला. गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरम फुलक्यांसह हे भरीत छान लागतं.
कमी कष्टात कमी वेळात पतिराजांना खूश करण्यासाठी हे भरीत खूपच छान!

डाळिंबी कॉशवे
साहित्य : २ कांद्यांची पेस्ट, १ टी स्पून लसूण पेस्ट, १ टी स्पून आलं पेस्ट, पाव चमचा हळद, धणे-जिरेपूड, १ चमचे कॉर्नफ्लोअर पेस्ट, २ वाटय़ा सोललेल्या डाळिंब्या.
* फोडणीसाठी : तेल, कढीपत्ता, हिंग, मोहरी.
* टॉपिंग- बारीक चिरून पातीचा कांदा, कुरडय़ा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा व ओलं खोबरं.
कृती : पातेल्यातील पाण्यात डाळिंब्या थोडय़ा प्रमाणात शिजवा. कढईत तेलावर मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करा. कांद्याची पेस्ट खरपूस भाजा. आलं-लसूण पेस्ट घालून परता. हळद, धणे, जिरेपूड, काश्मिरी मिरची पूड, मग उकळी आणा. शिजवलेल्या डाळिंब्या, मीठ व नारळदूध एकत्र करा. कॉर्नफ्लोअर पेस्ट घालून १ उकळी आणा. सर्व्हिंग बाउलमध्ये प्रथम डाळिंब्याची उसळ वाढा. वरून टॉपिंग्ज घाला. अनोखी लज्जतदार डिश तुमचीच वाट बघतेय!
प्रियांका अमिनभावी – response.lokprabha@expressindia.com