• जमीन – बाजरीसाठी थोडय़ा कमी खोलीची किंवा मध्यम खोलीची जमीन चालते.
  • पूर्वमशागत – एक नांगरट व तीन ते चार कुळवाच्या पाळ्या देतात, तसेच हेक्टरी दहा-बारा गाडय़ा शेणखत जमिनीत मिसळतात.
  • पेरणी – जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यावर १५ दिवसांच्या आत पेरणी केली जाते. १५ जून ते १५ जुलै या काळात पेरणी केल्यास उत्पन्न चांगले येते. पेरणी ४५ बाय १५ सें. मी अंतरावर करतात.
  • सुधारित जाती – संकरित बाजरीच्या ‘श्रद्धा’ बी के ५६०. एमएच १४३, एमएच १६९, एमएच १७९ या जाती आहेत. सुधारित वाणात डब्ल्यूसीसी ७५, आयसीटीपी ८२०३, आयसीएमव्ही ८७९०१, आरएचएर १ इत्यादींचा समावेश होतो.
  • रासायनिक खते – अवर्षणप्रवण भागात हेक्टरी ४० ते ४५ किलो नत्र व २० ते २५ किलो स्फुरद ही खते दिली जातात. मध्यम जमीन व बरा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात किंवा ओलिताची सोय असलेल्या जमिनीत हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद ही मात्रा योग्य ठरते. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी दिले जाते. राहिलेले नत्र २५ ते ३० दिवसांनी जमिनीत ओलावा असताना देतात.
  • पीक संरक्षण उपाय – भुंगे किंवा बाळी या किडीचा उपद्रव बाजरी पीक फुलोऱ्यात असताना होतो. म्हणून यावर बीएचसी (१० टर्के) पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळतात.

Nagpur, Gold Prices Drop, Continuous Increase, gold price drop in nagpur, nagpur gold price, today gold price, gold price decrease, gold in nagpur, nagpur news, gold news, marathi news,
खूशखबर…. सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे दरही ३ हजारांनी घसरले
heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण