दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांची दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.देशातील कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्ताराच्या कामांवर भारतीय कृषी अनुसंधान परिषद देखरेख करते. कृषी विद्यापीठांव्यतिरिक्त देशातील ९७ संशोधन संस्था या परिषदेच्या अखत्यारित येतात. तसेच कृषी विद्यापीठांना मिळणाऱ्या अर्थ साहाय्यामध्ये परिषदेचा वाटा ७० टक्केअसतो. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार परिषदेचे अध्यक्ष असून त्यांनीच डॉ. लवांडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात डॉ. लवांडे यांनी २४ वष्रे काम केले असून, राजगुरूनगर येथील कांदा व लसूण संशोधन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारीही संभाळली आहे. नोव्हेंबर २०११ पासून दापोलीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. लवांडे कार्यरत आहेत.