चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाळूचा डम्पर १५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 शनिवारी सकाळी संगमेश्वर बस स्थानकातून सुटलेल्या एसटीमध्ये इतर प्रवाशांसह २० ते २२ विद्यार्थी प्रवास करीत होते.
 कुळेवाशी येथे रस्ता खराब असल्याचे सांगत चालकाने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थी मागून येणाऱ्या डम्परमध्ये बसले. डम्पर फणसवळेच्या दिशेने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि डम्पर हेलखावे खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या १५ फूट खोल खड्डय़ात उलटला.