महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत यावेळी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बारावीच्या निकालाच्या अनेक तारखा फिरत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारच्या शासकीय सुटीनंतर सोमवारी तयारीचा अंतिम आढावा घेतला जाईल. त्यानंतर पत्रकार परिषदेत निकालाची तारीख जाहीर केली जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , ३० किंवा ३१ तारखेला बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. बोर्ड सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Three major announcements for RBI customers investors
रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक, गुंतवणूकदारांसाठी तीन प्रमुख घोषणा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या २८ मे रोजी जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठीच्या गुणांच्या पुनर्मुल्यांकनासंदर्भात काही दिवसांपासून वाद चालू होता. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रचलित गुण पुनर्मुल्यांकन पद्धत कायम ठेवण्याचा निकाल दिला होता. त्यानंतर सीबीएसई बोर्डाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील न करण्याचे ठरवल्यामुळे हा वाद तुर्तास शमला आहे. त्यामुळे बारावीचे निकालही जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला. सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २८ मे रोजी दुपारपर्यंत शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील. http://www.results.nic.in , http://www.cbseresults.nic.in , http://www.cbse.nic.in या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील.