बऱ्हाणपूर हे शहर मध्यप्रदेशात येते. गेल्या दोन वषार्ंपासून जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर या दोन्ही ठिकाणाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम मंदगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर या गावातील अंतर ६० कि.मी. आहे. जळगाव जामोदपासून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु बऱ्हाणपूरकडून मध्यप्रदेश सीमेपर्यंत १५ कि.मी.च्या रस्त्यापैकी ९ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत ६ कि.मी.चे काम अपूर्ण आहे. हा मार्ग सातपुडा पर्वतामधून जातो आणि रस्ताही अरुंद आहे. बऱ्हाणपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुं दीकरणासाठी वनविभागाकडून परवानगी घेतली आहे. पहाडाला रॉकब्रेकरने तोडून रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात येणार आहे. बाकी असलेले रस्त्याचे ६ कि.मी.चे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बांधकाम विभागाच्या अधिकारी सांगतात. जळगाव जामोद ते बऱ्हाणपूरपर्यंतचे अंतर ९० कि.मी. आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर हे अंतर ६० कि.मी. होणार आहे. आज जळगावहून बऱ्हाणपूरला पिंपळगावकाळे, कुऱ्हा मार्गाने जावे लागते. ही दोन्ही गावे महाराष्ट्र व मध्यप्रदेशात असून या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रात पूर्वी कांॅग्रेसचे सरकार होते. त्यामुळे या रस्त्याच्या निर्माणकार्यात उशीर झाला, असे जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे म्हणणे आहे, तर बऱ्हाणपूर येथील आमदार अर्चना चिटणीस यांच्या प्रयत्नाने या रस्ता कामाला प्रारंभ झाला आहे. काही महिन्यातच हे काम पूर्णत्वास येणार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यात भाजपची सत्ता असतानादेखील या कामाला वेळ का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी

सातपुडा पर्वतांमुळे अडचणी
या दोन्ही परिसराला जोडणाऱ्या भागात सातपुडा पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. या डोंगराला पोकलेन मशिन व रॉकब्रेकरने तोडावे लागणार आहे. त्यामुळे या मार्गात रस्ता बनवण्यात अडचणी येत आहेत.
राजेंद्र जोशी, कार्यपालन मंत्री,
सार्वजनिक बांधकाम विभाग, बऱ्हाणपूर.