मागील १५ वर्षांपासून सतत क्रीडांगणावर मेहनत करणाऱ्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे चार क्रीडाप्रकारांत विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  स्टेप अप्स,  पुश अप्स या क्रीडाप्रकारात ते विश्वविक्रम नोंदविण्याच्या तयारीत असून १ डिसेंबर रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा चमू उस्मानाबाद येथे येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी या क्रीडाप्रकारांचे प्रात्यक्षिकही तुळजाभवानी स्टेडियमवर दाखविण्याचे ठरविण्यात आले आहे. सुभाष सासणे व जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली.
सासणे म्हणाले, की ‘पुश अप विथ क्लॅप’ या क्रीडाप्रकारात एका मिनिटात कमीतकमी २५ पुश अप्स काढणार आहे. अशा प्रकारची नोंद या पूर्वी या क्रीडाप्रकारात झाली नसल्याचा दावा सासणे यांनी केला. तसेच ‘स्टेप अप्स विथ ४० एलबी पॅक’ या क्रीडाप्रकारात एका मिनिटात ५३ स्टेप अप्स करणार असल्याचेही सासणे यांनी सांगितले. यापूर्वी न्यूयॉर्क येथील रॉबर्ट नटोली या खेळाडूने ५२ स्टेप अप्स करून गिनीज बुकात नाव नोंदविलेले आहे. ‘पुश अप्स कॅिरग अॅन्डम् ८० एलबी पॅक’ या क्रीडाप्रकारात एका मिनिटात ४० पुश अप्स काढणे आवश्यक आहे. कारण यापूर्वी या क्रीडाप्रकारात इंग्लंडमधील पॅड्डी डोइल याने सप्टेंबर २०११ मध्ये ३८ पुश अप्स करून विश्वविक्रम केला आहे. ‘पुश अप्स ऑन मेडिसीन बॉल्स’ या क्रीडाप्रकारात एका मिनिटात ४८ पुश अप्स काढण्याचे ठरविण्यात आले आहे. जर्मनीतील ग्रेगॉर स्क्रेगल या खेळाडूने जून २०१३ मध्ये एका मिनिटात ४७ पुश अप्स करून विश्वविक्रम नोंदविला.
मेजर सुभाष सासणे यांचे जन्मगाव कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव आहे. सध्या ते पुणे येथे राहतात. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून बी. ए. केले. सन्यामध्ये आर्मी फिजिकल ट्रेिनग कोअरमध्ये कमिशन, सन्य अधिकारी म्हणून १९९७ मध्ये काम पाहिले आहे. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या ते उस्मानाबाद येथे जिल्हा सनिक कल्याण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. दोरीवरील उडय़ा या क्रीडाप्रकारात त्यांनी यापूर्वी ९ हजार ९९७ उडय़ांचा विश्वविक्रम नोंदविलेला आहे.
क्रीडाप्रकाराचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी विद्यार्थी व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.