अल्पवयीन मुलीला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक बाब कर्जत येथे समोर आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिद्धांत राहुल डाळिंबकर आणि पंकज मोरे अशी या दोघांची नावे आहेत. कर्जत येथे बौद्धवाडा येथे राहणाऱ्या सिद्धांत डाळिंबकर याने आपल्या मित्राच्या मदतीने पीडित मुलीला चाकू आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पीडित मुलीचे लंगिक शोषण केले. तिला बळजबरीने गाडीत बसवून पळसदरी रोड आणि कोतवालनगर येथील फ्लॅटवर नेऊन बलात्कार केला. तिचे छायाचित्रणही केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास तिला व तिच्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिली.
पीडित मुलीने याबाबतची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात नोंदवली. यानंतर सिद्धांत डाळिंबकर याच्याविरोधात भादंवि ३५४(अ)(ब)(क)(ड), ३७६(अ) लंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ३, ४, ११, १२ तसेच भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.