नाशिक महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी शहरातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आज (रविवारी) पोलीस आयुक्तालयात तातडीने बैठक घेतली. शुक्रवारी (दि.२०) जेलरोड येथे सुरेंद्र शेजवळ या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराची शिवाजीनगर भागात हत्या झाली. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सुरेंद्र शेजवळ यांची हत्या झाली. या हत्येमुळे राजकीय गुन्हेगारी उफाळून आल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे शहरात पूर्ववैमनस्यातून किंवा वैयक्तिक किंवा राजकीय कारणामुळे कोठेही घातपात किंवा दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी आयुक्तांनी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शहरात घातपात यासाठी कोणकोणती काळजी घेण्यात यावी, याच्या सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या.

Rahul Gandhi Congress Sam Pitroda Narendra Modi Caste Census wealth re-distribution
जातगणना, वारसा कर आणि संपत्तीचे फेरवाटप; काँग्रेसचे काय म्हणणे आहे?
Loksabha Election 2024 BJP Congress DMK manifestos legislations judicial reforms
रोहित वेमूला कायदा, UAPA रद्द; कायद्यातील बदलाबाबत प्रमुख पक्षांनी दिलेली आश्वासने कोणती?
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडे कोणकोणत्या गुन्हेगारांचा प्रवेश होतो आहे. या पक्ष प्रवेशांचा आढावा घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. मागील सर्व निवडणुकांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन यात गुंतलेल्या गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तुरुंगातून सुटलेल्या सर्व गुन्हेगारांवर आता कारवाई होणार असून त्यांना समन्स वॉरंट बजावले जाणार आहे. शहरातील विविध गुन्हेगारी टोळ्यांमधील सदस्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश आयुक्त सिंघल यांनी अधिका-यांना दिले आहेत.