अमर्याद पाणी उपशातून लातूर, उस्मानाबाद जिल्हय़ांत निर्माण झालेला पाणीबाजार, चाराटंचाईवर मात करण्यास झालेला उशीर, दिवसेंदिवस घटणारी पाणीपातळी, सहाशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पाश्र्वभूमीवर उद्या (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे मराठवाडय़ातील दुष्काळाबाबत आढावा घेणार आहेत. रा. स्व. संघाच्या बैठकीसाठी येणाऱ्या अनेक मंत्र्यांनी दोन दिवस बैठकांचा सपाटा लावला. दुष्काळावर चर्चा झाल्यानंतर सोमवारी (दि. २४) मराठवाडय़ाच्या अनुशेषावरही चर्चा होणार आहे.
संघ बैठकीसाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी औरंगाबादेत दाखल झाले.