राज्यभर ३४ शाखा, १७०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि १२०० कोटी रुपयांचे कर्जवाटप असलेल्या यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मनोहर प्रभाकर देव आणि उपाध्यक्षपदी आशिष हरिहर उत्तरवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गेल्या १५ वर्षांंपासून बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भाऊसाहेब मारोडकर आणि उपाध्यक्ष अजय मुंधडा यांना विश्रांती देत १६ सदस्यीय संचालक मंडळाने अचानक हा खांदेपालट केला आहे.
मावळते अध्यक्ष भाऊसाहेब मारोडकर (६८) यांनी प्रकृती स्वास्थ्याच्या कारणावरून राजीनामा दिल्यामुळे नव्याने अध्यक्षांची निवड करण्यात आली. सोबतच उपाध्यक्ष अजय मुंदडा यांच्याही पदत्यागामुळे उपाध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली.
बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका सहा महिन्यावर आलेल्या असतांनाच बँकेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अर्थात, अध्यक्ष-उपाध्यक्षपदांमध्ये अचानक खांदेपालट करण्याचा निर्णय संचालक मंडळाला घ्यावा लागला.