एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचा अभिनव उपक्रम

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षणारया किशोरवयीन मुलामुलांचे आता समुपदेशन केले जाणार आहे. किशोरवयिन मुलांच्या लंगिक समस्यांबाबत या उपक्रमा आंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय पेण यांच्या मार्फत जिल्ह्यातील आठ आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे.

आदिवासी समाजात अजुनही बालविवाहाची प्रथा रुढ आहे. शरीराची योग्य प्रकारात वाढ झाली नसल्याने कुपोषित बालके जन्माला येत आहे. त्यामुळे शालेयस्तरापासूनच याबाबत मुलामुलींचे प्रबोधन होण गरजेचे आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आश्रमशाळा आणि वस्तीशाळांमध्ये अल्पवयिन मुलींच्या लंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा लंगिक शोषणा विरोधात विद्यार्थ्यांनी समोर येऊन आवाज उठवला पाहीजे स्वताचे संरक्षण केले पाहीजे हा देखील या समुपदेशन कार्यक्रमा मागचा मुळ उद्देश आहे.

या उपक्रमाला जिवन कौशल्य उपक्रम असे नाव देण्यात आले आहे.किशोर वयात होणारे शारीरिक बदल,मानसिक बदल, लैगिंक आरोग्याची काळजी कशी घ्यावी,या आरोग्य विषयक प्रश्नासह मूलांच्या सुरक्षे बाबतीत असेलेले कायदे,लैगिंक अत्याचारा पासून मूंलाचे संरक्षण कायदा,बालविवाह प्रतींबंधक कायदा,मूलांच्यासाठी असणा-या यंञना,चाइल्ड लाइन,विशेष पोलीस,बालन्याय मंडळ या बाबतीत मुलामुलींचे समुपदेशन केले जाणार आहे.

हे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष पथकाची नेमणुक करण्यात आली आहे. यात डॉक्टर, वकील, बाल संरक्षण अधिकारी, महिला व मुले सहाय्यता कक्षाचे पोलीस अधिकारी, आणि चाईल्ड हेल्प लाईनचे समन्वयक यांचा समावेष असणार आहे. २५ सप्टेंबर पासून जिल्ह्यत या उपक्रमाला सुरवात होणार आहे. कर्जत येथील आश्रमशाळेतील समुपदेशन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे, महिला बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, आरोग्य अधिकारी सि के मोरे, आणि दिशा केंद्राच्या लिला सुर्वे उपस्थित राहणार आहे.

कर्जत तालुक्यातील चार, खालापुर तालुक्यात एक तर पेण तालुक्यातील तीन आश्रमशाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जाणार आहे.

आदिवासी  समाजाच्या विविध प्रश्नांबाबत तत्कालिन जिल्हाधिकारी शितल तेली यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे एक बठक झाली होती. यावेळी आश्रमशाळांमधील अत्याचार, आदिवासी समाजातील बालविवाह आणि त्यामुळे निर्माण होणारी कुपोषण समस्या यावर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडवायच्या असतील तर शालेय स्तरापासून मुलांचे प्रबोधन व्हायला हवे असा मुद्दा दिशा केंद्राच्या वतीने आम्ही उपस्थित केला होता. यानंतर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.  अशोक जंगले, समन्वयक दिशा केंद्र