गुड्डया खून प्रकरणातील सहावा आरोपी पोलिसांच्या गळाला लागला. विक्की उर्फ विक्रम रमेश चावरे (२७ रा.एकता नगर,धुळे) याला पोलिसांनी गुरुवारी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राऊ गावातून अटक केली. प्रमुख ११ पैकी आता पोलिसांच्या हाती ६ आरोपी लागले असून गोयर बंधू मात्र अद्यापही फरार आहे. रफीयोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्डया या गुंडाची १८ जुलैला गोपाल टी हाऊस येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्या करुन मारेकरी पसार झाले. या आरोपींचा शोध घेण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांची पथके दिवस रात्र प्रयत्न करत असून आतापर्यंत ६ आरोपींना राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. गुरुवारी पुन्हा एका प्रमुख आरोपीला शोध पथकाने पकडले. पोलीस निरिक्षक राठोड, हवालदार दिपक पाटील, पो. ना. रमेश माळी, पो. ना. कुणाल पानपाटील, पो. कॉ. रवी राठोड यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊ गावातून विक्रम उर्फ विक्की रमेश चावरे (वय २७ रा.एकता नगर,धुळे) या आरोपीला शिताफिने अटक केली. त्याला सकाळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

या खून प्रकरणी ६ आरोपींना अटक झाली असली तरी विलास गोयर (छोटा पापा), विजय गोयर (मोठा पापा हे गोयर जुळे भाऊ, विक्की गोयर, शाम गोयर आणि राजेंद्र देवरे उर्फ राजा भद्रा हे ५ प्रमुख आरोपी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून हेच या खून प्रकरणाचे मास्टरमांइड मानले जात आहेत. त्यांनीच खूनाचा कट करुन गुड्डयाला संपवले. आरोपींना आश्रय देणारे, पैसा पुरवणारे आणि इतर मदत करणार्‍यांनाही पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत मदत करणार्‍या ६ जणांना अटक करण्यात आली आहे.