शहरातील घडामोडीमुळे काँग्रेस पक्षाचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आमदार भाऊसाहेब कांबळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्यातील राजकीय संबंधांमुळे कार्यकर्ते गोंधळून गेले आहे.

[jwplayer f2HtZAlb]

पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा आदिक निवडून आल्या. त्यांनी राजश्री ससाणे यांचा पराभव केला. तसेच निवडणूकीनंतर दहा नगरसेवकांनी बंड केले. त्यामध्ये आमदार कांबळे यांचे चिरंजीव संतोष यांचा सहभाग आहे. शहरातील घडामोडीचे पडसाद हे ग्रामीण भागात उमटु लागले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ससाणे यांनी ग्रामीण राजकारणातही शह दिला. ग्रामपंचायत व सेवासंस्थांच्या निवडणूकीत आर्थिक रसद पुरविली. त्यामुळे अनेक निवडणूकांत त्यांना यश आले.

ग्रामीण राजकारण हे महाग झाले. पुढे ग्रामपंचायत व सेवासंस्था निवडणुका न लढविण्याचे मुरकुटे यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्याचा फायदा हा कांबळे व ससाणे समर्थक घेवू लागले होते. पण आता शहरात काँग्रेसला धक्का  बसल्याने त्याचे हादरे ग्रामीण भागातही जाणवत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली. पण काँग्रेस पक्षाकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

पालिकेतील धक्क्य़ामुळे पक्षाचे कार्यकर्ते गोंधळले आहे. त्यातच ससाणे व कांबळे यांच्यात राजकीय अंतर पडत आहे. त्याचा परिणाम होणार आहे. जिल्हा परिषदेचे तीन गट हे शहराभोवती आहे.

या गटात दलित व मुस्लिम मतदारांचा भरणा अधिक आहे. इच्छुक उमेदवार हे निवडणूकीच्या तयारीला लागले होते. पण त्यांनी आता सावध पावित्रा घेतला आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात काही मोजके कार्यकर्ते हे सक्रिय आहेत. पण काही विरोधकांच्या संपर्कात आहे. शहरातील सत्ता बदलाचा झटका बसण्याची भीती कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.

[jwplayer gSSKhmYu]