‘विकी डोनर’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या अभिनेता आयुष्यमान खुरानाने या चित्रपटानंतर ‘बेवकूफयाँ’ आणि ‘नौटंकी साला’सारखे चित्रपट केले. पण, त्याच्या आगामी ‘हवाईजादा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहता असे दिसते तो त्याच्या आधीच्या सर्व चित्रपटांच्या ट्रेलरना त्याने मागे टाकले आहे.
‘हवाईजादा’ या चित्रपटात आयुष्यमान एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट वैज्ञानिक शिवकर बापूजी तलपदे यांच्या जीवनावर आधारित आहे. भारतातील पहिले मानवरहित विमान तळपदे यांनी बनवले होते असे म्हटले जाते. चित्रपटाचा ट्रेलर हा खरचं थक्क करणारा असून तो नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत नेण्यास यशस्वी होईल असे वाटते. आयुष्यमान व्यतिरीक्त यात पल्लवी शारदा, मिथुन चक्रवर्ती यांच्याही भूमिका आहेत.
विभू पुरी दिग्दर्शित ‘हवाईजादा’ पुढील वर्षी ३० जानेवारीला प्रदर्शित होईल.