‘अँड टिव्ही’वरील ‘दिल्ली वाली ठाकूर गर्ल‘ मालिकेतील बिन्नीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, मालिकेत बिन्नीची व्यक्तिरेखा साकारणारी शिल्पा रायजादा घराघरांत पोहोचली आहे. शिल्पा साकारत असलेली ही व्यक्तिरेखा एका गृहिणीची आहे. सतत तक्रारीचा सूर लावणारी मालिकेतील तिची व्यक्तिरेखा काहीशी विनोदी धाटणीची आहे. शिल्पाने या अगोदर ‘हमारी देवरानी’, ‘वीर शिवाजी’, ‘कृष्णाबेन खाखरवाला’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जोधा –अकबर’मध्ये तिने साकारलेल्या शहनाज निगार या वेडया मुलीच्या भूमिकेला भारतासह परदेशातील प्रेक्षकांकडूनदेखील पसंत केले गेले होते. ‘दिल्ली वाली ठाकूर गर्ल‘मधील माझी भूमिका खूपच चांगली असून, यात मी एका सामान्य गॄहिणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. अनेक सूनांना मालिकेतील माझी व्यक्तिरेखा त्यांच्या जीवनाशी निगडीत वाटत असल्याने माझ्या अभिनयाला चांगली पसंती मिळत आहे. सतत काही ना काही करणावरून तक्रारीचा सूर लावणारी ही व्यक्तिरेखा असली, तरी तिला विनोदाचा तडका दिला असल्याने बिन्नीची व्यक्तीरेखा गंमतीशीर बनली असल्याचे शिल्पाने सांगितले.