यावेळी खिलाडी कुमार बी-टाऊनमध्ये साजऱ्या होणाऱ्या दिवाळी पार्टीमध्ये दिसणार नाही. कारण तो या दिवाळीमध्ये मुंबईतच असणार नाही. अक्षय कुमार आणि त्याचे संपूर्ण कुटुंब नुकतेच मुंबई एअरपोर्टवर दिसण्यात आले होते. यावेळी तो सहकुटुंब मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात आहे. अक्षय, ट्विंकल आणि त्यांची दोन्ही मुलं आरव आणि नितारा यावेळी कॅमेरामध्ये कैद झाले.

आतापर्यंत या कुटुंबाचे अनेक फोटो लोकांनी पाहिले आहेत. पण निताराचा एकही स्पष्ट फोटो माध्यमांसमोर आला नव्हता. यावेळी पहिल्यांदा निताराचा फोटो मिळवण्यात प्रसारमाध्यमांना यश मिळालं आहे. ती आपल्या आईचा हात पकडून चालताना दिसते. यावेळी तिने पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला असून त्यावर जीन्सचं जॅकेटही घातलं आहे. तिच्या या लूकमध्ये ती फारच निरागस दिसते यात काही शंका नाही. आतापर्यंत अक्षय आणि ट्विंकल यांनी निताराचा फोटो सोशल मीडियावर येऊ नये याची पुरेपुर खबरदारी घेतली होती. पण यावेळी निताराचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी तिही कॅमेऱ्याकडे पाहून निरागस हसतही होती.

akshay-twinkle1

दरम्यान, सैन्याप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या खिलाडी कुमारने सीमा सुरक्षा दलातील शहीद जवान गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. खिलाडी कुमारने शहीद गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत देण्याचे ठरवले आहे. ज्या ठिकाणी शहीदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या फक्त घोषणाच केल्या जात आहेत आणि या मदत निधीवरुनही राजकारण रंगत आहे त्याच ठिकाणी खिलाडी कुमारने दिलेला हा मदतीचा हात अनेकांनाच परिस्थीतीचे गांभीर्य सांगून जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ या पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना जखमी झालेले जवान गुरनाम सिंग यांचा उपचार घेत असताना जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. २६ वर्षांच्या गुरनाम सिंग यांनी शुक्रवारी सीमेवर दहशतवाद्यांनी केलेल्या स्नायपर हल्ल्याचा प्रतिकार केला होता व त्यात ते जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

akshay-daughter