महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईमध्ये आलेल्या ७ तरुणांच्या स्वप्नांचा प्रवास म्हणजे ‘फ्रेशर्स’ ही मालिका. या मालिकेतून सिद्धार्थ खिरीड हा फ्रेश चेहरा आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. आपल्यातील प्रत्येकाच्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देण्यात ही मालिका यशस्वी ठरली आहे. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थने siddharth khirid त्याच्या बालपणातील क्रशबद्दल सांगितले.

वाचा : सेलिब्रिटी क्रश : ‘…. आणि ती अचानक निघून गेली’

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

लहान असताना अशी एक तरी मुलगी असते जी मुलांचं मन जिंकते. त्या वयातील प्रेम अल्लड असलं तरी त्यामागची भावना वाईट नसते. सिद्धार्थलाही असं अल्लड क्रश झालं होतं. याविषयी सिद्धार्थ म्हणाला की, माझ्या सोसायटीमध्येच एक मुलगी होती. त्यावेळी आमच्या प्रेमनगर या सोसायटीत विविध सण साजरे केले जायचे. गणेशोत्सवात तर आम्हा लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं जात होतं. या स्पर्धांमध्ये सर्व लहान मुलं सहभाग घ्यायची. आम्ही सोसायटीत नवीन राहायला आल्यामुळे माझी फारशी कोणाशी ओळख नव्हती. त्यामुळे मला गणेशोत्सवात सहभागी होण्यात फारसा रस नव्हता. पण, त्या पंजाबी मुलीमुळे मी गणपती विसर्जन आणि इतर सर्व गोष्टींमध्ये सहभागी झालो. खरंतर मला तिचं नावसुद्धा माहित नव्हतं. केवळ तिची एक झलक दिसावी म्हणून मी शेवटी डान्समध्ये भाग घेतला आणि तिच्यासोबत नाचलो. त्यानंतर आमचा काही संपर्क झाला नाही आणि मीसुद्धा फारसा काही त्याकरिता प्रयत्नही केला नाही.

वाचा : सेलिब्रिटी क्रश : ‘क्रश’ वगैरै नको रे बाबा….!

चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com