‘दंगल’ या सुपरहिट सिनेमात गीता फोगट आणि बबीता फोगट यांची व्यक्तिरेखा साकारलेल्या अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्राने नुकताच बंजी जंपिंगचा मनमुराद आनंद लुटला. ऋषिकेशला हेवलघाटात या ‘दंगल गर्ल्स’ने भरपूर सेल्फी आणि व्हिडिओही काढले. दोघींनीही हे व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. गुरुवारी सकाळी त्या दोघीही ऋषिकेशहून ४० किमी लांब असलेल्या मोहनपट्टी पोहोचल्या. इथे दोघींनी ‘बंजी जंपिंग’, ‘फ्लाइंग फॉक्स’ आणि ‘जाएण्ट स्विंग’ अशा साहसी खेळांचा आनंद लुटला. साधारणपणे तीन तास या दोघी वेगवेगळे खेळ खेळण्यात मग्न होत्या. दोघींनी ५० हजाराव्या बंजी जंपिंग सेंटरवर केकही कापला.

अभिनेता अमिर खानने दंगल या सिनेमात महावीरसिंग फोगट यांची भूमिका साकारली होती. नेहमीप्रमाणेच या सिनेमातूनही आमिरने अनेकांची दाद मिळवली होती. सिनेमातील अभिनयासाठी आमिरसोबतच फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या नवोदित अभिनेत्रींची सर्वांनीच प्रशंसा केली होती.