इंडिया कोटूर विक २०१६ च्या निमित्ताने रॅम्पवर आलेल्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने ‘आपल्याला दीपिकासोबत काम करायला आवडेल’ असे सांगितले आहे. दीपिकासह काम करण्याचा अनुभव घ्यायला आवडेल असेही फवाद खान म्हणाला आहे. नुकत्याच सुरु झालेल्या इंडिया कोटूर विक २०१६, या फॅशन जगतातील या प्रतिष्ठीत सोहळ्याला फवाद आणि दीपिका मनिष मल्होत्राच्या डिझाईन्ससाठी ‘शो स्टॉपर्स’ म्हणून रॅम्पवर उतरले होते.
‘झिंदगी गुलझार है’ या पाकिस्तानी मालिकेतून ‘जारुन जुनैद’ची भूमिका साकारत फक्त पाकिस्तानातच नव्हे तर भारतात आणि जगातल्या इतर काही भागातील चाहत्यांच्या मनावर फवाद खानने उल्लेखनीय छाप पाडली होती. त्यानंतर ‘खूबसुरत’ या चित्रपटातून अभिनेत्री सोनम कपूरसह मुख्य भूमिका साकारत फवादने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणानंतर अवघ्या काही काळातच फवादची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह ‘कपूर अॅन्ड सन्स’या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांनीही दुजोरा दिला होता. सध्या हा नवखा पण रसिकांच्या तितक्याच जवळचा असा फवाद खान करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘केजो’च्या या आगामी चित्रपटात फवाद खानसह, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. तेव्हा आता हिंदी चित्रपट सृष्टीत चांगलाच जम बसवलेल्या फवादची दीपिकासह काम करण्याची इच्छा कोणता निर्माता-दिग्दर्शक पूर्ण करणार हे येणाऱ्या वेळात स्पष्ट होईलच.

The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?