करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोघी एकमेकींच्या फार जवळ आहेत. एक मोठी बहिण या नात्याने करिष्माने नेहमीच करिनाला योग्य ते मार्गदर्श दिलं. आता करिना गरोदर आहे आणि आपल्या आयुष्याच्या एका नवीन पर्वात पदार्पण करणार आहे. या तिच्या नवीन पर्वातही करिष्मा करिनासोबत ठामपणे उभी आहे. लोकांचे सल्ले ऐकण्यापेक्षा आपल्या मनाला जे वाटते तेच करावे असा सल्ला करिष्मा सध्या करिनाला देत आहे.
करिष्माला गरोदरपणासाठीच्या तू काय टिप्स देतील याबद्दल बोलताना करिष्मा म्हणाली की, करिनाला सध्या मी एवढंच सांगू शकते की, प्रत्येक व्यक्तिचे सल्ले घेऊ नकोस. कारण गरोदर महिलांसाठी सगळ्यांकडेच सांगण्यासारखं काही ना काही असतं. मला असं वाटतं की तुम्हाला येणाऱ्या अनुभवातून आणि मनात येणाऱ्या विचारांतूनच शिकावे.
करिनाने गरोदरपणावर एक पुस्तक लिहिलं आहे. ‘माय यम्मी मम्मी गाइड’ या नावाचं ते पुस्तक आहे. या पुस्तकात गरोदर होण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकात करिनाने मॅटर्निटी आउटफिटपासून ते मुलांची खोली सजवण्यापर्यंत आणि बाळाला सांभाळण्यापासून ते व्यावयासिक जबाबदाऱ्या सांभाळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तिने या पुस्तकात सांगितल्या आहेत. एवढंच नाही तर मुलांसाठी खास पार्टीचे आयोजन करण्याच्या टिप्सही तिने या पुस्तकात दिले आहेत.
करिना कपूरची प्रसुती डिसेंबरमध्ये होणार आहे. करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचे पहिले बाळ आहे. करिना सध्या तिच्या बेबी बम्पसह अनेक ठिकाणी दिसण्यात येत आहे. नुकतेच तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर सब्यसाचीसाठी रॅम्प वॉक केले होते.