पौगंडावस्थेतील मुलांची भावावस्था ही क्षणाक्षणाला बदलत जाणारी असते. या काळात शिक्षणाच्या निमित्ताने का होईना पालकांपासून दूर आणि बऱ्याच अंशी शिक्षकांच्या ताब्यात असणारी आपली मुलं नेमकं काय करत आहेत, याबद्दल कित्येकदा पालक अनभिज्ञ असतात. अशा वेळी मित्रांमध्ये रमणारी, परस्परांच्या साथीने मोठय़ा होणाऱ्या मुला-मुलींच्या मनाचा कौल जाणून घेण्यास पालक आणि शिक्षक दोघेही असमर्थ ठरतात. भीमराव मुंडे दिग्दर्शित ‘कौल मनाचा’ या चित्रपटात पौगंडावस्थेतील मुलं, त्यांचं शालेय जीवन, अभ्यास, त्यांच्या मनात उमलत जाणाऱ्या प्रेमभावना या सगळ्याचा कौल घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रयत्नाला मांडणीतल्या नावीन्याची जोड मिळाली असल्याने हा कौल प्रेक्षकांना प्रसन्न करणारा ठरला आहे.

राज, प्रथमेश आणि रितिका ही तीन मुलं वसतिगृहातून पळून गेली आहेत. या तिघांचा शोध चित्रपटात सुरू होण्याआधी आपली ओळख राजशी होते. राज ही या चित्रपटातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. चित्रपटांचे वेड असलेला राज, नेहमी प्रत्येक प्रसंगात चित्रपटातील संवाद बोलत आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न करणारा राज एकाचवेळी निरागसही आहे आणि कितीही पडलो तरी मांजरीसारखा पुन्हा उभा राहण्याइतपत खंबीरही आहे. मनाविररुद्ध घटना घडत गेल्याने थोडासा हट्टीपणा असलेला राज शाळेत आलेल्या नव्या शिक्षिकेला हेमाला पाहताच तिच्या प्रेमात पडतो. आपल्या शिक्षिकेबद्दल वाटणारे आकर्षण पुरते संपायच्या आतच एका घटनेमुळे त्याला रितिका आवडायला लागते. रितिकावर आपला प्रभाव पडावा म्हणून राज हरएक प्रयत्न करतो आणि एकाक्षणी तो तिचा होकार मिळवण्यासाठी तिला कोंडीत पकडतो. दिग्दर्शक म्हणून या साध्या-सरळ क थेची मांडणी करताना भीमराव मुंडे यांनी फ्लॅशबॅक आणि पुन्हा वास्तव याची योग्य सरमिसळ करत कथा पुढे नेली आहे. एका निर्णायक क्षणी कथा पुन्हा एकदा वळण घेते आणि आपल्या हट्टी स्वभावानुसारच एक अभ्यासू आणि गुणी मुलगा म्हणून झालेले राजचे स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळते. यातही राजची शिक्षिका हेमा, तिचे ज्यांच्याशी लग्न ठरले आहे ते साने सर आणि इन्स्पेक्टर प्रथमेश या तिन्ही व्यक्तिरेखा, त्यांचे आपसातील संबंधही दिग्दर्शकाने हळूवार उलगडले आहेत. हा सगळा प्रवास एकूणच रंजक ठरला आहे.

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित

मात्र या मांडणीत अनेक व्यक्तिरेखांना पुरेसा खुलण्यासाठी वाव देण्यात आला नसल्याने अनेक धागे दिग्दर्शकाने असेच सोडून दिले आहे. राजचा फिल्मीपणाही पुरेसा ठसत नाही, त्याच्यात आलेला हट्टीपणा, त्याच्या सिनेमाप्रेमाचा उगम अशा कित्येक गोष्टी अर्धवट आहेत. प्रथमेशच्या वागण्यातील बदलही तितकासा ठसत नाही. त्यामुळे कित्येक ठिकाणी चित्रपट अर्धवट राहतो. पण एक कथा म्हणून पूर्वार्धातील सूत्राचाही उत्तरार्धात दिग्दर्शकाने प्रभावी वापर करून घेतला असल्याने चित्रपट उत्तरोत्तर रंजक ठरतो. राज, प्रथमेश आणि रितिका या तिन्ही भूमिकांमधून आशुतोष गायकवाड, निनाद तांबडे आणि गिरिजा प्रभू या तिघांनी जान ओतली आहे. मात्र या तिघांपेक्षाही विश्वंभरच्या भूमिकेतील गणेश सोनावणे जास्त भाव खाऊन जातो. शिक्षिकेच्या भूमिकेतील अमृता पत्की आणि इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील राजेश शृंगारपुरे यांच्यातील प्रसंगही दिग्दर्शकाने छान खुलवले आहेत. चित्रपटासाठी रोहन रोहन यांनी दिलेले संगीतही श्रवणीय आहे. चित्रपटात जमून आलेल्या गोष्टी खूप आहेत त्यात आणखी सुटलेल्या थोडय़ा गोष्टी अचूक पकडल्या असत्या तर हा सर्वोत्तम चित्रपट ठरला असता!

कौल मनाचा
दिग्दर्शक – भीमराव मुंडे
कलाकार – अमृता पत्की, राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, आशुतोष गायकवाड, निनाद तांबडे, गिरिजा प्रभू, गणेश सोनावणे, वर्षां दांदळे, विजय गोखले, विजय चव्हाण, मिलिंद गुणाजी.