समाजातील गोष्टींवर निर्भिडपणे बोलणाऱ्यांमध्ये कोंकणा सेन शर्मा या अभिनेत्रीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’सारखा सिनेमा तिने केला. आतापर्यंत तिने अनेक सिनेमांमध्ये बोल्ड भूमिका केल्या आहेत. कोंकणाने आता एक असे बोल्ड वक्तव्य केले आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कोंकणा म्हणाली की, गावातल्या महिलांना गर्भनिरोधक गोळ्या मोफत दिल्या गेल्या हव्यात. शहरात स्थिती चांगली आहे पण गावांमध्ये कदाचित असे नाहीये. म्हणून अशा भागांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या या मोफत दिल्या पाहिजेत, असं मतं कोंकणाने मांडले.

कपिल शर्माने या कलाकारांना ठेवलं ताटकळत?

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमातील एका दृश्यात कोंकणा वेगवेळ्या दुकानात थोडी लाजतच कंडोम खरेदी करायला जाते. ‘ही फक्त कंडोमची गोष्ट नाहीये तर सॅनिटरी नॅपकिनबाबतही तेच आहे. अनेक महिलांना या गोष्टी विकत घेताना लाज वाटते. या सिनेमातून आम्ही या विषयाला वाचा फोडली याचा आम्हाला आनंद आहे.’ लिपस्टिक अंडर माय बुरखा हा सिनेमा २१ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

…आणि ती शाहरुखला म्हणाली, ‘तुला अभिनय येत नाही’

सेन्सॉर बोर्डसोबत साधारण ६ महिने झालेल्या संघर्षानंतर आता हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा चार महिलांच्या आयुष्याभोवती फिरतो. नित्यनेमांची कामं करून, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवं असतं. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक- शाह, अहाना कुमरा आणि प्लाबिता बोरठाकुर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पिरीट ऑफ एशिया अवॉर्ड आणि मुंबई चित्रपट महोत्सवात लैंगिक समानतेसाठी बनलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून गौरविण्यात आले होते.