‘तुम्हारी शरण मे तांबडे बाबा….’ असं म्हटलं तर एकच चेहरा आपल्या सर्वांच्याच डोळ्यांसमोर उभा राहतो. तो चेहरा म्हणजे अभिनेता मिलिंद शिंदे. खलनायकी भूमिकेला एक वेगळीच ओळख देऊन ही भूमिका घराघरात पोहोचवणारा हा अभिनेता एक उत्तम लेखकही आहे. अनेकांना ही बाब माहित नसेल, पण हे खरंय. महाविद्यालयीन दिवसांपासूनच लेखनाची आवड असणाऱ्या मिलिंद शिंदे यांचं स्वत:च्या पुस्तकाचं लिखाणही आता शेवटच्या टप्प्यात आलं असून, लवकरच हे पुस्तकवाचकांच्या भेटीला येणार आहे. वाचनाप्रती नितांत आदर आणि तितकीच निष्ठा असणाऱ्या या अभिनेत्याचा किताबखाना नेमका कसा असेल याचीच उत्सुकता तुम्हालाही आहे ना, चला तर मग जाणून घेऊया खुद्द मिलिंद शिंदे त्यांच्या किताबखान्याविषयी सांगताएत तरी काय…

माझ्या किताबखान्यात बरीच पुस्तकं आहेत. यामध्ये विविध लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. पण, या पुस्तकांच्या गर्दीत मला सर्वाधिक भावतात ती म्हणजे जी.ए.कुलकर्णी, संजय पवार, मिलिंद बोकील आणि राजन खान यांची पुस्तकं. त्यातही जी.ए. कुलकर्णी आणि राजन खान यांच्या पुस्तकांकडे माझा विशेष कल. या दोन्ही लेखकांची कोणतीही आणि कितीही पुस्तकं मी कधीही वाचू शकतो. ‘काजळमाया’, ‘हिरवे रावे’, ‘रमलखुणा’, ‘सांजशकुन’ ही जी.ए यांच्या लेखणीतून उतरलेली माझ्या विशेष आवडीची पुस्तकं. तर, राजन खान यांच्या लेखणीनेही माझ्यावर जादू केली होती. ‘शरियत’, ‘कसक’, ‘जातवान’, ‘विनशन’ आणि ‘रसअनौरस’ ही त्यांच्या शैलीत सजलेली माझ्या आवडीची पुस्तकं. या दोन्ही लेखकांच्या शैलीविषयी सांगावं तर, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन आणि त्या गोष्टींचं आपल्या कथांमध्ये, त्यात रंगवलेल्या व्यक्तिरेखांमध्ये चित्रण करण्याची पद्धत मला फारच भावली.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

त्याशिवाय, इंग्रजी पुस्तकं वाचण्याकडेही माझा कल आहे. इंग्रजीतील आत्मचरित्रपर पुस्तकं मी जास्त वाचतो. सहसा अशा पुस्तकांच्या बाबतीत मी उअनुवादित न वाण्यासाठी आग्रही असतो. कारण, माझ्या मते कधीकधी अनुवाद करत असताना शब्दांचा गभितार्थ नाहीसा होतो. अर्थात अनुवादित पुस्तकांच्या बाबतीतील कोणाताच नकारात्मक मुद्दा मांडायचा नाहीये. कारण, अनुवादित पुस्तकांमध्ये मूळ लेखकाचा भाव तसाच ठेवण्याचा अतोनात प्रयत्नही करण्यात येतो. अशाच काही पुस्तकांच्या यादीत मला भावलेलं एक पुस्तक म्हणजे, ‘अॅण्ड देन वन डे अ मेमॉईर’. नसिरुद्दीन शाह लिखित या पुस्तकाची मुळ आणि अनुवादित अशा दोन्ही आवृत्ती मला भावल्या.

हल्लीच्या पिढीत रुजलेल्या वाचनाच्या सवयीविषयीसुद्धा त्यांनी आपलं मत मांडलं, हल्ली दर मिनिटाला प्रत्येकाच्या वाचनाचा कल बदलतोय. विविध प्रकारच्या उपलब्ध माहितीच्या आधारे वाचकांच्या समोर बरेच पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या वाचनाचा कलही तितक्याच वेगाने बदलत आहे. पण, त्यातही वावगं काहीच नाही असं मला वाटतं, मुळात वाचकाला काहीच वर्ज्य नसतं. कारण एखादा जर १० ओळी वाचत असेत तर त्यातील किमान एक ओळ तरी त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरु शकेल. कालांतराने या सवयीमुळेच एक वेगळा दृष्टीकोन, नवी मतं आणि नवे विचार समोर येतील. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत मिलिंद शिंदे यांनी त्यांचा किताबखाना आवरता घेतला.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@loksatta.com