काही कलाकरांना कोणत्याही ओळखीची गरज नसते. त्यांचं नावच सर्व काही सांगून जातं. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता सचिन पिळगावकर यांचं. विविध मराठी चित्रपटांसोबतच ‘सत्ते पे सत्ता’ आणि ‘शोले’ या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. बालकलाकार म्हणून या कलाविश्वात पदार्पण करत सचिन पिळगावकर यांनी अभिनयासोबतच गायन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रावरही आपली छाप सोडली.

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने नुकताच मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ६० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी चित्रपटसृष्टी, राजकारण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली होती.
‘मुव्हिंग पिक्चर्स’तर्फे सचिन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आनंद पाहण्यास मिळत होता. सचिन यांनी यावेळी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणाही केली. अशा या लाडक्या अभिनेत्याला सोशल मीडियावरुनही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा प्रसिद्ध चेहऱ्यांनी हजेरी लावली होती.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सचिन यांनी सपत्नीक फोटोसाठी पोझ दिली. या सर्व कार्यक्रमामध्ये श्रिया पिळगावकरच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा होता. दरम्यान, बऱ्याच दशकांपासून चित्रपटविश्वात विविध कारणांनी सक्रिय असणाऱे सचिन पिळगावकर येत्या काही दिवसांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाला म्हणजेच अभिनय बेर्डेला आगामी चित्रपटात संधी देणार आहेत.