अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ चित्रपट काल देशभरात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट म्हणून ‘न्यूटन’ची निवड झाल्याची घोषणाही करण्यात आली. ‘ऑस्कर’ स्पर्धेत पाठविण्यासाठी झालेल्या निवडीमुळे हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल अशी भावना अमित मसूरकर यांनी व्यक्त केली.

वाचा : बिकिनीतील फोटो शेअर करणाऱ्या अभिनेत्रीला नेटिझन्सनी दिला पोट कमी करण्याचा सल्ला

राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, रघुवीर यादव, संजय मिश्रा यांच्या भूमिका असणाऱ्या ‘न्यूटन’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास दीड कोटी रुपयांची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या संजय दत्तच्या ‘भूमी’ने २.२५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे ट्विट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केलेय.

लोकशाही व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि आपली स्वत:च्या सोयीची व्यवस्था यात प्रत्येक जण इतका व्यवस्थित अडकला आहे की त्यातून बुद्धीच्या किंवा तर्काच्या आधारेही कोणी बाहेर पडायचा प्रयत्न केलाच तर तो इतरांच्या दृष्टीने वेडा ठरतो. ‘न्यूटन’ या आपल्या दुसऱ्याच चित्रपटातून लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस दाखवताना दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी या व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच अचूक बोट ठेवले आहे.

वाचा : आमिरने चक्क पुरस्कार सोहळ्याला लावली उपस्थिती!

प्रभावी व्यक्तिरेखा, त्यांचे वास्तववादी चित्रण आणि तरीही कोणाला न दुखावता, चिमटे न काढताही जे आहे ते मांडत विचार करायला लावणारा ‘न्यूटन’ हा सर्वार्थाने वैचारिक ताकदीचा चित्रपट आहे.