हिंदी सिनेमाचे जग म्हणजे काही काही वेळा ‘कुछ भी, कही भी’.. असाच एक नमुना, एका चकाचक कागदाच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर श्रीदेवी आपल्या दोन मुली, जान्हवी व खुशी अशी दोघींसोबत चमकली (त्यात पतीदेव बोनी कपूर का नाही?)  एवढय़ावरच ही ‘प्रेमाची गोष्ट’ अथवा ‘पीपल’ स्टोरी थांबत नाही. याच ‘चौघांना’ त्या निमित्ताने प्रसारमाध्यमासमोर पेश केले. (या वेळी पतीदेव कशाला?)
अशा वेळी फार काही गंभीर प्रश्न वगैरे होण्याची शक्यता नसते. माहौलदेखील मस्तीभरा होता. जान्हवी व खुशी आयुष्यात पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आल्या. जान्हवी थोडी धीट वाटली, खुशी अगदीच लाजाळू वाटली. दोघींनी एका प्रश्नाला मला अगदी सारखेच उत्तर दिले, हा योगायोग म्हणायचा की वस्तुस्थिती?
‘मम्मीचे तुझ्या आवडते चित्रपट कोणते?’
जान्हवी म्हणाली, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘सदमा’ व ‘मिस्टर इंडिया’. खुशीने हे का उत्तर दिले ते तिलाच माहीत.