सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्री-दिवाळी सेलिब्रेशनची पार्टीही आयोजित केल्याचे पाहायला मिळाले. विविध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री सध्या दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात व्यग्र झाले असून या उत्साही माहोलाला सुरुवात झाली आहे. सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा आणि शाहरुख खान यांच्या घरी दिवाळी पार्टीत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तर निर्माता रमेश तौरानी यांनीसुद्धा नुकतच दिवाळीच्या निमित्ताने एका खास पार्टीचे आयोजन केले होते. तसेच, डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनीही प्री-दिवाळी पार्टीचे आयोजन केलेले.

दिवाळी २०१७ : ‘तितिक्षा माझ्यासाठी अगदी रव्याच्या लाडवाप्रमाणे…. क्षणार्धात विरघळणारी’

अबू जानी आणि संदीपच्या पार्टीला सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसुद्धा गेलेली. विशेष म्हणजे, या पार्टीत तिने घातलेला अनारकली ड्रेस लक्षवेधक ठरला. सेलिब्रिटी म्हटल्यावर भरजरी आणि महागडे कपडे तर येणारच ना. पण तिने पार्टीत घातलेला ड्रेस पाच वर्षांपूर्वी सैफ आणि करिनाच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीतही घातला होता. सेलिब्रिटी नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला आणि पार्टीला नवीन कपड्यांना प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळते. पण, साराने जुनाच ड्रेस घातल्याने अनेकांनाच आता चर्चेला विषय मिळाला आहे.

TOP 10 NEWS : सेलिब्रिटींच्या दिवाळी प्लॅन्सपासून ते धोनीने फुटबॉलच्या मैदानावर मारलेल्या अफलातून गोलपर्यंत..

लवकरच सारा ‘केदारनाथ’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत दिसेल.