एक दशकाहून अधिक काळ लाखो हृदयांवर राज्य करणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी ‘इंग्लिश विंग्लिश’च्या सफलतेनंतर पुन्हा एकदा बोनी कपूर निर्मित ‘मॉम’ चित्रपटात अभिनय करताना दिसेल. या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली होती. रवि इयवार हा अभिनेता या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात श्रीदेवीशिवाय सजल अली, अक्षय खन्ना, अदनान सिद्दीकी आणि अभिमन्यू सिंह मुख्य भूमिकेत दिसतील. तर नवाजुद्दिन सिद्दीकी एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शुटींग २४ जूनला पूर्ण झाले असून, या चित्रपटाद्वारे श्रीदेवी आणखी एका सशक्त भूमिकेत दिसले.