प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी सलमान खानचा कोणता ना कोणता सिनेमा प्रदर्शित होत असतो. सुट्यांच्या दिवसांत सिनेमात प्रदर्शित केल्यामुळे त्याच्या सिनेमाला गल्ला कमवण्यात नेहमीच मदत झाली आहे. यावर्षीही सलमानचा ट्युबलाइट सिनेमा प्रदर्शित झाला. पण हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकायला अयशस्वी ठरला असे म्हणायला हवे. एकीकडे निर्माते या सिनेमाला पहिल्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त कमाई मिळेल अशी अपेक्षा करत होते. पण जी स्वप्न पाहिली तसे काही वास्तवात पाहायला मिळाले नाही.

…म्हणून झू-झूने ट्युबलाइटचे प्रमोशन केलेच नाही

ईदच्याच दिवशा या सिनेमाने फक्त १९.९ कोटींची कमाई केली. जर या आकड्यांना भाईजानच्या पाच वर्षांतील त्याच्या सिनेमाच्या आकड्यांशी तुलना केली तर ती फारच कमी आहे. समीक्षकांकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादाचा सिनेमावर मोठा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. हा सिनेमा पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा आकडा पार करण्यात अयशस्वी ठरली होती. चार दिवसांत या सिनेमाने फक्त ८३ कोटी रुपयांची कमाई केली.

शुक्रवारी या सिनेमाने २१.७ कोटींची कमाई केली तर शनिवारी २१.१७ कोटी, रविवारी २२.४५ कोटी, सोमवारी १९.०९ कोटी आणि मंगळवारी १२ कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाची एकूण कमाई ९५.८६ कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशीही हा सिनेमा १०० कोटींची कमाई करण्यात अयशस्वी ठरला. व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर सिनेमाच्या कमाईचे अधिकृत आकडे शेअर केले. या सिनेमाने आतापर्यंत एकाही दिवशी ३० कोटींचा आकडा पार केला नाही.

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’च्या मृत्यूने पांजरपोळ संस्था शोकाकूळ

तरण आदर्शने लिहिले की, ‘ईदच्या दिवशीही या सिनेमाने ३० कोटींचा आकडा गाठला नाही याचे आश्चर्य वाटते.’ गेल्यावर्षी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या सुलतान सिनेमाने तीन दिवसांमध्येच १०५.५३ कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. तर त्याआधी प्रदर्शित झालेला बजरंगी भाईजान या सिनेमाने १०२. ६० कोटींची कमाई केली होती. तर त्याआधी एक था टायगर सिनेमाने १००.१६ कोटींची कमाई केली होती.
हा एक अॅक्शन सिनेमा असेल असे सलमानच्या चाहत्यांना वाटले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तो अॅक्शनपटच करत आला आहे. पण हा एक भावनिक सिनेमा आहे. शिवाय सिनेमाच्या संहितेमध्येच दम नाही असेही अनेक प्रेक्षकांचे मत पडले.