आपल्या जीवनातले लहान मोठे अनुभव सतत ट्विटरवर शेअर करणारी अभिनेत्री आणि लेखिका टि्वंकल खन्नाने नुकताच प्रवासादरम्यानचा आपला अनुभव शेअर केला आहे. यासाठी तीने Choking At 30,000 Feet हा हॅशटॅग वापरला आहे.

ट्विंकल आपली छोटी बहीण रिंकीसोबत मोठ्या सुट्टीवर युरोपमध्ये गेली होती. युरोपातील अनेक ठिकाणे फिरल्यानंतर शेवटी ऑस्ट्रियातून मुंबईकडे परतताना विमानात तिला खूपच गैरसोयीला सामोरे जावे लागले. खूपच कमी काळ तीचा चांगला प्रवास झाला, बराच काळ तर तीला आपल्या जागेवर बसवतच नव्हते. चक्क गुदमरल्यासारखे होत असल्याचे तीने म्हटले आहे. त्याचे कारणही तीने ट्विटरवर सांगितले. या प्रवासादरम्यान तिच्या बाजूला एक माणूस बसला होता. ज्याच्या पायातील सॉक्सची आजूबाजूला दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ८ तास आपल्या नाकावर अत्याचार होत होता असे ट्विंकलने म्हटले आहे. हे सांगण्यासाठी तीने #ChokingAt30000Ft हा हॅशटॅग वापरला.

ट्विंकला सांगते की, शेजारी बसलेल्या प्रवाशाला मी खूपच आदराने विचारले की, “तुमच्या सॉक्समध्ये दोन मेलेले बेडूक आहेत का? तुमच्या सॉक्समधून येणारा वास हा एखाद्या रासायनिक शस्त्राप्रमाणे आहे” या प्रवाशासोबतचा विमान प्रवास खूपच संतापजनक होता, असे तीने म्हटले आहे. ट्विंकलच्या या प्रवास वर्णनानंतर ट्विटरवर तीला फॉलोवर्सने अनेक कमेंट दिल्या आहेत. यात तीने या सहप्रवाशाला कशा प्रकारे प्रश्न विचारायला हवे होते याच्या अनेक टीप्सचाही समावेश आहे.

ट्विंकल खन्ना बॉलिवूड अभिनेत्री आहे, त्याचबरोबर ती लेखिका असून तीने नुकतेच ‘मिसेस फनी बोन्स’ आणि ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ ही इंग्रजी पुस्तके लिहीली आहेत. तसेच ती प्रिंट मीडियातून नियमित कॉलमही चालवते. पहिल्यांदाच ती पती अक्षयकुमार अभिनित आगामी ‘पॅडमॅन’ या सिनेमाची निर्मितीही करत आहे.