अर्जुन रामपाल याच्या बहुचर्चित ‘डॅडी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. एक कुख्यात गुंड ते राजकारण्यापर्यंतचा अरूण गवळीचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमधील या सिनेमाची उत्सुकताही वाढली आहे. या सिनेमाचा ट्रेलर स्वत: डॅडी म्हणजेच अरूण गवळी यानेही पाहिला आणि ट्रेलर संपल्यावर ‘जास्त झालंय…’ अशी प्रतिक्रियाही त्याने दिल्याचे समजते.

सर्जरीसाठी भारतीला रुग्णालयात दाखलं करावं लागलं

अर्जुनने सांगितले की, ‘तो या गोष्टीने खूप आनंदी आहे की, या सिनेमाचा ट्रेलर पाहून अरूण गवळी आणि त्याचे कुटुंबिय खूश झाले. इतकेच नाहीतर गवळी कुटुंबियांना ट्रेलरवर इतरांच्या मिळालेल्या प्रतिकिया पाहून त्यांचा या सिनेमावरील विश्वास अधिक वाढला आहे.’ हा सिनेमा २१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

हा सिनेमा करणं म्हणजे एक जोखीम उचलण्यासारखी वाटत नाही का असा प्रश्न जेव्हा अर्जुनला विचारण्यात आला तेव्हा अर्जुन म्हणाला की, ‘ही जोखीम आहे की नाही हे प्रेक्षक सिनेमा पाहून झाल्यावरच ठरवतील. जेव्हा नीरजा सिनेमा आला तेव्हा कोणाला माहित होतं की हा सिनेमा हीट होईल.’

नागिण, माशी झाली आता आणखी एक भपंक हिंदी मालिका तुमच्या भेटीला

तर ‘डॅडी’ सिनेमाचे दिग्दर्शक आशिम अहलुवालिया म्हणाला की, ‘गवळीची कहाणी पडद्यावर दाखवल्याचं कौतुक सध्या अनेकजण करत आहेत. मला एका चांगल्या कथेवर काम करायचं होतं. म्हणून मी हा विषय निवडला. हा सिनेमा कुणाची बाजू घेण्यासाठी नाहीये, तर कुणाच्यातरी जीवनातील सत्य सांगण्यासाठी आहे. या सिनेमात तेच दाखवलं गेलंय जे त्याच्या जीवनात घडलंय.’