“अरे अमोघ उठ ना… कॉलेजला जायचं नाहीय का..?” पहाटे पाच वाजता अंतराचा फोन आला होता.. अमोघ झोपेतच होता.. अस्वस्थ वाटत असल्यानं रात्रीदेखील तो लवकर झोपला होता..

“अंतरा, मला थोडं बरं वाटत नाहीय.. अशक्तपणा आहे.. तापदेखील आलाय.. त्यामुळे मी घरीच थांबतो.. आराम करतो.. तू जा कॉलेजला..” अमोघच्या आवाजातूनच त्याचा अशक्तपणा जाणवत होता..

“काही मेजर नाहीय ना..? तू औषध घे, म्हणजे ताप जाईल.. आणि आराम कर, म्हणजे अशक्तपणादेखील जाईल.. काळजी घे स्वत:ची”

Shocking video accident in ghat video
घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य आहे भयंकर, पाहताना जरा जपूनच
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
Health Special, eating, chillies, reduce, weight, health tips, healthy lifestyle, food, self care, body care, marathi news,
Health Special: मिरची खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं?
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

“हो गं.. घेतो मी काळजी.. इतकं काही झालं नाहीय.. आराम केला की बरं वाटेल.. तू जा कॉलेजला.. नाहीतर उशीर होईल.. आपण उद्या भेटू कॉलेजमध्ये..”

“हो.. लवकर बरा हो.. चल बाय.. काळजी घे हा..” अंतराने फोन ठेवला..

काही दिवसांपासून अमोघ आणि अंतरा सकाळी कॉलेजला जाताना एकत्र जायचे.. खरंतर दोघेही काही जवळ राहात नव्हते.. अमोघ विक्रोळीला, तर अंतरा दादरला.. मात्र तरीही अंतरा दररोज पहाटे उठल्यालर अमोघला फोन करायची.. अलार्म बंद करुन झोपणारा अमोघ अंतराच्या एका फोनवर उठायचा आणि तयारी करायला लागायचा.. अमोघ अंतराला दादरला भेटायचा आणि तिथून ते चर्चगेटला सोबतच जायचे.. एकाच कॉलेजमध्ये आणि त्यातही एकाच वर्गात असल्याने दोघांना बराच वेळ सोबत घालवता यायचा.. मात्र त्यातही आणखी वेळ सोबत घालवण्यासाठी दोघे सकाळी दादरला भेटून पुढे एकत्रच कॉलेजला जायचे..

अमोघची तब्येत बरी नसल्यानं अंतरा एकटीच कॉलेजला गेली होती.. अंतराला एकटीलाच प्रवास करावा लागला होता.. लेक्चरलादेखील ती एकटीच होती.. बोरिंग लेक्चरमध्ये तिला अधूनमधून हसवणारा अमोघ आज कॉलेजला आला नव्हता.. अंतरा अमोघला खूप मिस करत होती.. त्यातच अमोघची तब्येत ठिक नसल्याने अंतराच लक्ष अभ्यासात लागत नव्हतं.. एक लेक्चर बसून ती कॉलेजमधून निघाली..

अमोघच्या घराची बेल वाजली.. अमोघने जाऊन दार उघडलं..

“अंतरा तू इथे कशी..?” अंतराला पाहून अमोघला धक्काच बसला.. कारण अंतरा कधीच अमोघच्या घरी आली नव्हती..

“पेशंटला भेटायला आले.. आणि इथे तर पेशंटच आले दरवाजा उघडून स्वागताला..” अमोघला पाहून अंतराला आनंद झाला होता..

“तू इकडे कशी काय..? कॉलेजला नाही गेलीस? आणि तुझ्याकडे माझ्या घराचा पत्ता कसा काय आला..?” अमोघने प्रश्नांचा मारा सुरु केला..

“अरे किती ते प्रश्न.. तोंडी परीक्षा सुरु आहे का..? तुलाच भेटायला आले.. कॉलेजला गेले होते.. एक लेक्चर अटेण्ड केलं.. आणि तुझ्या घराचा पत्ता एकदा फॉर्मवर पाहिला होता..”

तेवढ्यात अमोघची आई किचनमधून बाहेर आली.. अमोघने आईला अंतराची ओळख करुन दिली. अंतरा अमोघसारखीच अगदी सडपातळ होती.. अगदी झिरो फिगर.. ब्लॅक जिन्स, त्यावर डार्क ब्लू टॉप आणि डोक्यावर सरकवलेला गॉगल.. अमोघला पहिल्यांदाच एखादी मैत्रीण घरी भेटायला आली होती.. त्यामुळे अमोघच्या आईलादेखील आश्चर्य वाटलं होतं.. अमोघसोबत थोड्या गप्पा मारल्यावर, त्याची विचारपूस केल्यावर अंतरा निघून गेली..

अमोघ आणि अंतराचं नातं खूप छान होतं.. वर्षभरापासून दोघे एकमेकांना ओळखायचे.. कॉलेजला सोबतच येणं-जाणं होतं.. त्यामुळे अनेकांना ते रिलेशनशिपमध्ये आहेत, असं वाटायचं.. मात्र तसं काही नव्हतं.. मात्र अमोघ एक दिवस सोबत नसल्यावर अंतराला खूप एकटं एकटं वाटलं होतं.. आणि अंतराला एक दिवस न भेटल्याने अमोघला चुकल्याचुकल्यासारखं वाटलं होतं.. अखेर अंतरा थेट घरीच आल्याने दोघांनाही बरं वाटलं होतं.. दिवस पुढे सरकत होते.. सेकण्ड एयर संपत आलं होतं..

“अमोघ, खूप जणांना असं वाटतं की आपण दोघं कमिटेड आहोत..” अंतरा एक दिवस कॉलेजवरुन घरी परतत असताना म्हणाली..

“माहितीय मला.. मला खूप जणांना विचारलंदेखील..”

“मग काय म्हणालास तू…?”

“मी काय म्हणणार..? जे आहे तेच सांगितलं.. वी आर जस्ट फ्रेंड्स..”

“मीदेखील तेच सांगते.. पण उगाच काहीजण एक लडका और लडकी दोस्त नहीं हो सकते, असं काहीतरी बोलतात.. काहीही यार.. सगळ्याचं थोडीच असं असतं..? हो ना अमोघ..?” अंतराने अमोघच्या मनात काही आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला..

“एक लडका और लडकी दोस्त नहीं हो सकते म्हणे.. तसं तर प्रेमाची सुरुवात मैत्रीनेच होते ना..? पण प्रत्येक मैत्रीचं रुपांतर कुठे प्रेमात होतं..? मैत्री छान असते यार.. एकदा कमिटेड झालं की मग भांडणं, वाद होतात.. प्यार में जुनून है.. पर दोस्ती में सुकून है..”

“ऐ दिल है मुश्किलमधला डायलॉग.. पण मला नाही वाटतं आपली भांडणं होतील..” दादर स्टेशनला पोहोचता पोहोचता अंतरा म्हणाली..

“मलादेखील नाही वाटतं..” अमोघच्या तोंडून पटकन वाक्य निघालं.. अंतरा आणि अमोघनं एकमेकांकडे पाहिलं.. दोघांना एकमेकांच्या मनात नेमकं काय चाललं कळलं होतं..

“मग मिस अंतरा, माझं आडनाव लावण्यात इंटरेस्टेड आहात का तुम्ही..?” अमोघनं हसत हसतच विचारलं..

“हो.. चालेल ना.. मला आवडेल मिसेस अमोघ व्हायला..” अंतरानं दुसऱ्याच क्षणाला होकार दिला होता..

अनेकांना प्रपोज करायला, होकार कळवायला बराच वेळ लागतो.. मात्र हा क्षण अंतरा आणि अमोघनं अगदी हसत खेळत अनुभवला होता.. दोघांमधील नातं इतकं घट्ट होतं की ना अमोघला विचार करावा लागला ना अंतराला उत्तरासाठी वेळ घ्यावा लागला.. त्यानंतर दोघांमधील नातं आणखी फुलत गेलं..

“अमोघ, मी आज कॉलेजला येत नाहीय..” अंतराने सकाळी रडवेल्या सूरात फोनवर म्हटलं..

“का..? काय झालं..? काही सिरीयस आहे का..?” अमोघने काळजीच्या स्वरात विचारलं..

“अरे.. कॉलेजला येण्यासाठी निघाले होते.. ग्राऊंड फ्लोअरला पाय घसरुन पडले.. पायाला लागलंय.. सूज आलीय.. आता मी क्रिम लावलीय.. पण कॉलेजला येणं शक्य नाही.. मी आराम करते..”

“ठिक आहे.. काळजी घे..” अमोघनं फोन ठेवला..

थोड्या वेळाने अंतराच्या घराची बेल वाजली.. अंतरा हळूहळू चालत चालत दरवाज्यापर्यंत पोहोचली.. दरवाजा उघडताच समोर अमोघ दिसला.. अंतरा काही बोलणार इतक्यात अमोघने तिला दोन्ही हातांनी उचलून घेतलं आणि अलगद सोफ्यावर नेऊन ठेवलं..

“अमोघ, तू काय करतोयस..? कुणीतरी येईल ना..” अंतरा घाबरली होती..

“ए वेडपट.. तसं काही करत नाहीय मी.. तुझ्या पायाला लागलंय म्हणून तुला उचलून घेतलं होतं..”

“ओके.. मला वाटलं..” अंतरानं अर्धवट वाक्य म्हटलं..

“तुला काय वाटलं ते कळलं हा मला अंतरा.. आपली अवस्था काय, आपल्या मनातल्या कल्पना काय..?” अमोघ बोलता बोलता किचनमध्ये गेला आणि थोड्या वेळाने बाहेर आला..

“चला मॅडम, पाय सरळ करा..” अमोघ अंतराला म्हणाला..

“पाय सरळ नाही होतंय.. तुला काय करायचंय नेमकं..?” अंतरानं रडवेला सूर लावला..

“हळद उगाळून आणलीय.. लेप लावला की बरं वाटेल.. सूजदेखील उतरेल..” अमोघनं हळूहळू अंतराचा पाय सरळ केला अंतराला वेदना होत होत्या.. त्यामुळे अमोघनं अगदी हळूहळू तिच्या पायाला हळदीचा लेप लावला.. अगदी अलगद पायावर हळद लावणाऱ्या अमोघकडे अंतरा पाहातच राहिली..

काही दिवसांनी कॉलेज संपलं.. दोघांनीही जॉब करण्यास सुरुवात केली.. अमोघचं ऑफिस चर्चगेटला, तर अंतराचं ऑफिस गोरेगावला होतं.. मात्र तरीही दोघे एकमेकांना वेळात वेळ काढून भेटत होतं.. भेटणं कमी झालं होतं.. मात्र त्याचा दोघांच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही.. काही दिवसांनी एकमेकांनी नात्याबद्दल घरी सांगायचं ठरवलं.. दोघांच्या घरातून फारसा विरोध झाला नाही.. अमोघची आई अंतराला आधी भेटली होतीच.. आईला अंतरा तेव्हाच आवडली होती.. अंतराच्या घरच्यांनीदेखील नात्याला मान्यता दिली..

“लगेच ऐकले दोघांचे आई-बाबा.. मला वाटलं आधी नकार देतील.. मग त्यांना समजवावं लागेल..” एके दिवशी ऑफिसनंतर भेटल्यावर अमोघ अंतराला म्हणाला..

“मलादेखील दोन्हीकडून इतका लगेच होकार अपेक्षित नव्हता.. घरी सांगितल्यावर किती काय काय घडतं, राडे होतात, असं ऐकलं होतं मित्रांकडून.. पण आपल्या बाबतीत तर काहीच घडलं नाही..”

“खूपच सुरळीत झालं सगळं.. जराही विरोध झाला नाही.. मला वाटलं तुझ्या घरातून थोडा विरोध होईल.. पण कसलं काय.. आईने लगेच तोंड गोड वगैरे केलं..”

दोन्हीकडून इतक्या सहजपणे नात्याला मान्यता मिळेल, असं अंतरा आणि अमोघला वाटलं नव्हतं.. मात्र आयुष्य इतकं सहजसोपं कधीच नसतं.. आणि त्याचाच प्रत्यय अंतरा आणि अमोघला लवकरच येणार होता..

 

(क्रमश:)

तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित