24 October 2017

News Flash

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाला पर्यावरण खात्याचा हिरवा कंदील

पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या वांद्रे-वर्सोवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 24, 2013 9:07 AM

पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या वांद्रे-वर्सोवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. वांद्रे-वर्सोवा दरम्यानचा ९.८९ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्यासाठी अंदाजे ४३४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. किनाऱ्यापासून ९०० मीटर आत समुद्रावर बांधण्यात येणारा हा सागरी सेतू आठ पदरी असेल. येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी चार मार्गिका त्यावर असतील. या सेतूवर जाण्यासाठी व येण्यासाठी वांद्रे आणि जुहू येथे दोन जोडरस्ते (कनेक्टर) बांधण्याचेही प्रस्तावित आहे. जानेवारी २०१४ मध्ये या सेतूचे बांधकाम सुरू करायचे आणि पाच वर्षांत संपवायचे असे नियोजन आहे.

First Published on January 24, 2013 9:07 am

Web Title: bandra worli sea link gets approval from environmental ministry