सामान्य प्रवाशांमध्ये नाराजी

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या जुन्या लाल रंगाच्या बसगाडय़ांचा चेहरामोहरा बदलून पांढऱ्या रंगावर पिवळे पट्टे असलेल्या दोन नव्या बसगाडय़ा मुंबईच्या रस्त्यांवर उतरवल्या आहेत. सध्या वांद्रे-कुर्ला संकुल व सीएसटी या दोन मार्गावर या बसगाडय़ा धावू लागल्या आहेत. यापैकी वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक (पूर्व) या मार्गावरील वातानुकूलित बसगाडय़ा केवळ ठरावीक खासगी कंपनीत काम करणाऱ्या पासधारक कर्मचाऱ्यांकरिताच चालविल्या जात असल्याने सामान्य प्रवाशांमध्ये नाराजीची भावना आहे. सामान्य प्रवासी या माहितीपासून अनभिज्ञ असल्याने काही ठिकाणी त्यांचे बेस्ट कर्मचाऱ्यांशी खटकेही उडत आहेत.

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

बेस्टने आपल्या ताफ्यातील सर्व वातानुकूलित बसगाडय़ांना १७ एप्रिलपासून कायमची विश्रांती दिली आहे. मात्र नवीन रंगसंगती असलेली वातानुकूलित ‘ए एस ३१०’ ही बसगाडी वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक पूर्व या मार्गावर २७ एप्रिलपासून धावू लागली. मात्र ही बस केवळ ठरावीक कॉपरेरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिताच राखीव आहे. ‘वन बीकेसी’ इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिताच ही बस चालवली जात आहे. ही बस बेस्टने भाडेतत्त्वावर दिली असून फक्त ‘वन बीकेसी’ इमारतीच्या पासधारक प्रवाशांनाच त्या बसमधून प्रवास करता येतो.

सकाळी ८.४० आणि ९.४० वाजता आणि सायंकाळी ५.४० आणि ७.४० वाजता या बसगाडय़ा वांद्रे पूर्व स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर धावत आहेत. सकाळ-संध्याकाळ एकूण सहा वेळा या बसगाडीने खेपा घातल्या. मात्र या बसगाडय़ांमधून ठरावीक खासगी पासधारकांनाच प्रवास करता येत आहे. इतर सामान्य प्रवाशांना त्याची कल्पना नसल्याने त्यांचा मात्र गोंधळ उडत आहे. काही ठिकाणी तर बसमध्ये चढलेल्या सामान्य प्रवाशांना खाली उतरविण्यात आल्याने त्यांचे बेस्ट कर्मचाऱ्यांशी खटकेही उडाले.

ती बस भाडेतत्त्वावर

दुसरी बस बसमार्ग १११ वर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गेट वे ऑफ इंडियादरम्यान धावते आहे. या बसमधून सर्वसामान्यांना प्रवास करता येतो. ३१० मात्र भाडे व  प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली आहे. त्यामुळे त्या बसमधून संबंधित कंपनीचे पासधारकच प्रवास करू शकतील, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफाणे यांनी दिली.