महाराष्ट्र शासनाच्या भाषाविषयक धोरणाचा पंचनामा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्रातर्फे २७ आणि २८ सप्टेंबर रोजी रवींद्र नाटय़ मंदिराशेजारील कला दालनात एका व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीसमोरील प्रश्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्रितपणे पहिल्यांदाच मांडले जाणार आहेत. मान्यवर व्यंगचित्रकारांची या विषयावरील व्यंगचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.या प्रदर्शनासाठी प्रभाकर वाईरकर, प्रभाकर भाटलेकर, प्रशांत कुलकर्णी, महेंद्र भावसार, गजू तावडे आदी व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रे काढली आहेत.