राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी ते ३० एप्रिल २०१४ या चार महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वित्त विभागाने शनिवारी तसा आदेश काढला आहे. केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकारने १ जानेवारीपासून सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना १० टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता.प्रत्यक्षात त्याची १ मे २०१४ पासून अंमलबजावणी झाली.