दिल्लीत ओळख झालेल्या व्यक्तीने मुंबईत भेटायला बोलावून त्याला लुटल्याची घटना भायखळ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी भायखळा पोलीस तीन ठकसेनांचा शोध घेत आहेत.मनीष द्विवेदी (३८)याची व्यक्तीची अनिस बदमी याच्याशी दिल्लीत ओळख झाली होती. त्यानंतर ते फोनद्वारे संपर्कात होते. अनिसने मनीष यांना मुंबईत भेटायला बोलावले होते. मनीष आणि अनिस नरिमन पाइंटला भेटले. त्यानंतर अनिसने जेवण्यासाठी टॅक्सीने फिर्यादी मनीष यांना भायखळ्यात नेले. तेथे एका गल्लीत नेल्यावर दबा धरून बसलेल्या अनिसच्या दोन साथीदारंनी पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केली आणि द्विवेदी यांच्याकडील रोख १५ हजार रुपये, एटीएम कार्ड आणि दोन मोबाइल फोन घेऊन फरार झाले. भायखळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस या ठकसेनांचा शोध घेत आहेत.