इनोव्हा गाडीत एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असले तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पुरावे गोळा करत आहे.
एका ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर धारावी पोलिसांनी चार जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या महिलेच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
वैद्यकीय चाचणीत महिलेच्या शरीरावर जखमा आढळलेल्या नाहीत. याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.