संप पुकारून प्रवाशांना वेठीस धरु नका, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी रिक्षाचालकांना सुनावले आहेत. मुंबई ग्राहक संघाने रिक्षाबंदविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने रिक्षाचालकांना खडसावले आहे.
कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी पुकारलेल्या संपातून अनेक संघटनांनी आधीच माघार घेतल्याने संपात आधीच फूट पडली आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील रिक्षाचालकांनी बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. बंद काळात कोकण विभागातील रिक्षा कोणाच्याही दबावाला बळी न पडता सुरळीत सुरू राहतील, असे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले.