‘व्हिवा लाऊंज’मध्ये आज दिग्दर्शिका गौरी शिंदे

आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणारी तरुण दिग्दर्शिका गौरी शिंदे मंगळवारी

प्रतिनिधी, मुंबई | November 20, 2012 05:49 am

आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणारी तरुण दिग्दर्शिका गौरी शिंदे मंगळवारी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये सहभागी होणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा’ या पुरवणीच्या सेलिब्रिटी संपादिका सोनाली कुलकर्णी तिच्याशी मुक्त संवाद साधणार असून, कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणी आणि महिलांनाही गौरी शिंदेला आपल्या मनातील प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, रवींद्र नाटय़ मंदिराच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये दुपारी चार वाजता होणारा हा कार्यक्रम सर्व महिला आणि तरुणींसाठी विनामूल्य खुला आहे.
‘इंग्लिश विंग्लिश’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठमोळ्या गौरीने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला.  ‘‘ती’च्या यशासाठी..’ अशा टॅगलाइनने सुरू झालेल्या या कार्यक्रमात आतापर्यंत सोनाली बेंद्रे, अंजली भागवत, खासदार सुप्रिया सुळे, बेला शेंडे, आरजे मलिष्का आणि आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर सहभागी झाल्या होत्या. तरुणी आणि महिलांनीही मनमोकळेपणे त्यांच्याशी संवाद साधला होता.

First Published on November 20, 2012 5:49 am

Web Title: gouri shinde in viva lounge today