डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला येत्या ६ डिसेंबरपूर्वी सुरुवात करावी, अन्यथा ६ डिसेंबर रोजी इंदू मिलमध्ये घुसून स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येईल, असा इशारा रिपब्किन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिला आहे.
येत्या ६ डिसेंबर रोजी आंबेडकरी जनतेचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्व जबाबदारी शासनावर असेल, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
इंदू मिलची जमीन स्मारकासाठी हस्तांतरित करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला लोकसभेत मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
संसदेच्या ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात या निर्णयाला संसदेची मंजुरी मिळावी आणि त्याच दिवशी सायंकाळी इंदू मिलमध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले जावे, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.