जैतापूर येथे उभारण्यात येणाऱ्या ९९०० मेगावॉटच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे आंदोलन पुन्हा सुरू होत आहे. बुधवार, २ जानेवारी २०१३ रोजी माडबन व आसपासच्या गावांतील ग्रामस्थ, मच्छिमार प्रकल्पस्थळावर मानवी साखळी करून धरणे धरणार आहेत. जैतापूर येथे राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळामार्फत ९९०० मेगावॉटचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आणि त्यासाठी बळजबरी जमीन घेतल्याच्या विरोधात ‘कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समिती’च्या झेंडय़ाखाली हे आंदोलन होत आहे.